NMC
अखेर वीज कंपनीने दिले ‘शट डाऊन’ न करण्याचे आश्वासन
महाराष्ट्र वीज वितरण कंपनी तर्फे बुधवार ५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत करण्यात येणारा ‘शट डाऊन’ अखेर मागे घेण्यात आला आहे.बुधवारी ५ ऑगस्ट रोजी अयोध्या येथे श्री राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दूरदर्शन वाहिन्यांवर दाखविण्यात येणार आहे. असे असताना वीज वितरण कंपनीने उद्या (ता. ५) सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत ‘शट डाऊन’चा संदेश ग्राहकांच्या मोबाईलवर पाठविला.ग्राहकांनी याची दखल घेत थेट महापौर संदीप जोशी यांच्याकडे तक्रार केली.
महापौरांनी वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांना ही बाब लक्षात आणून दिली. कार्यकारी अभियंत्यांनी पत्राचे गांभीर्य लक्षात घेत ‘शट डाऊन’ चा निर्णय रद्द करीत असल्याचे महापौरांना कळविले.
या निर्णयामुळे नागपूरकर राम मंदिर भूमिपूजन सोहळा वाहिन्यांवरून अनुभवू शकेल, याबद्दल नागपूरकर जनतेने महापौर संदीप जोशी आणि वीज वितरण कंपनीचे आभार मानले आहे
News Credit To NMC