आजही ३५३ नागरिकांस मास्कचा दंड: ११ दिवसांत ६४४२ कारवायांपश्चातही लोक जुमानत नाहियत!
नागपूर:- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी शुक्रवारी (१८ सप्टेंबर) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार ३५३ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून रुपये ५०० प्रमाणे १ लक्ष ७६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. मागील काही दिवसात शोध पथकांनी ६४४२ नागरिकांविरुध्द कारवाई करुन रु. १५,८०,०००/- चा दंड वसूल केला आहे.
नागपूरात रुग्णांची संख्या सतत वाढत आहे तसेच मृतांची संख्या पण वाढत चालली आहे. यावर नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज दहा ही झोनमधील मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई करत आहे. नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी वारंवार मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे इ. ची सूचना नागपूर मनपा व्दारे वारंवार केली जात आहे.
तरीसुध्दा नागरिक मास्क शिवाय फिरत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून मास्क न घातल्याबददल रु ५००/- दंड आकारण्यात येत आहे.लक्ष्मीनगर झोन अंतर्गत ३९, धरमपेठ झोन अंतर्गत ४१, हनुमाननगर झोन अंतर्गत २४, धंतोली झोन अंतर्गत ४२, नेहरुनगर झोन अंतर्गत १६, गांधीबाग झोन अंतर्गत २०, सतरंजीपूरा झोन अंतर्गत २७, लकडगंज झोन अंतर्गत ११, आशीनगर झोन अंतर्गत २६, मंगळवारी झोन अंतर्गत १०५ आणि मनपा मुख्यालयात २ जणांविरुध्द शुक्रवारी ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
आतापर्यंत लक्ष्मीनगर झोन अंतर्गत ६६७, धरमपेठ झोन अंतर्गत १२८९, हनुमाननगर झोन अंतर्गत ५८८, धंतोली झोन अंतर्गत ७१४, नेहरुनगर झोन अंतर्गत ३९५, गांधीबाग झोन अंतर्गत ४११, सतरंजीपूरा झोन अंतर्गत ४००, लकडगंज झोन अंतर्गत ३७७, आशीनगर झोन अंतर्गत ६७५, मंगळवारी झोन अंतर्गत ८७८ आणि मनपा मुख्यालयात ४८ जणांविरुध्द कारवाई करण्यात आली आहे.