ऊर्जा मंत्र्यांनी घेतली तातडीने व्ही.सी., राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी साधला संवाद
ऊर्जा मंत्र्यांनी घेतली तातडीने व्ही.सी., राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी साधला संवाद
५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता घरातील दिवे बंद करण्याच्या प्रधानमंत्र्यांच्या आवाहनानुसार महाराष्ट्रातील विजेची स्थिती सुरळीत राहावी व अखंडित वीज पुरवठा राहावा यासाठी राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज सकाळी ११.३० वाजता व्हिडीओ कॉन्फरंसिंगवर ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव व महावितरण, महानिर्मिती, महापारेषणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांचेशी तपशीलवार चर्चा केली.
ऊर्जा विभागाने केलेल्या तयारीचा वीज कंपनी निहाय आढावा त्यांनी घेतला, औष्णिक विद्युत केंद्राचे ५ संच (चंद्रपूर, कोराडी, पारस), कोयना जलाविद्युत केंद्र, उरण वायू विद्युत केंद्र तसेच ४०० केव्ही., ७६५ केव्ही पारेषण लाईन्सची उपलब्धतता, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना तसेच तिन्ही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याचे त्यांनी निर्देश दिले व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविले.
ऊर्जा मंत्री स्वत: आज रात्री ८.३० ते ९.३० या वेळेत विद्युत भवन नागपूर येथिल नियंत्रण कक्षातून राज्यभरातील परिस्थितीवर लक्ष ठेवून राहणार आहेत.