‘ए’ रक्तगटाला कोरोना धोका अधिक, ही निव्वळ अफवा
नागपूर : संशोधनाच्या नावाखाली आता कोरोना विषाणूची अफवा पसरवली जात आहे. यात ‘ए’ रक्तगट असलेल्यांना कोरोनाचा सर्वात अधिक धोका तर ‘ओ’ रक्तगट असलेल्या लोकांना कमी धोका असल्याचे समोर येत आहे. परंतु हे वृत्त चुकीचे असल्याचे प्रसिद्ध फिजिशियन डॉ. जय देशमुख यांचे म्हणणे आहे.
त्यांच्यानुसार, या संदर्भात कुठलेही पुराबे उपलब्ध नाहीत. कोरोनाची झालेल्या वृत्तानुसार, युहान मधील वैज्ञानिकांनी सुमारे २१७३ कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांचा अभ्यास केला. यात सुमारे ३८ टक्के लोकांचा रक्तगट ‘ए’ होता. तर ‘ओ’ रक्तगट असलेल्या रुग्णांची २६ टक्के होती. या शिवाय, हुयेई प्रांतातील तीन रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये सुमारे भीती पसरविण्याचे हे एक निमित्त असू शकते, असेही डॉ. देशमुख म्हणाले.एका ब्रिटिश वृत्तपत्र मध्ये प्रसिद्ध२०६ लोकांचा मृत्यू झाला.
यापैकी ८५ मृतांचा रक्तगट ‘ए’ होता. असेच संशोधन दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये करण्यात आले असता ‘ए’ रक्तगट असणारे लोकच कोरोनाचे जास्त बळी ठरल्याचे दिसून आल्याचेही वृत्तात म्हटले आहे. सध्या हे वृत्त ‘सोशलमीडियावर व्हायरल झाले आहे. ‘ए’ रक्तगट असलेल्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे. तर ‘ओ’ रक्तगट असलेल्या लोकांना रान मोकळे झाले आहे.
है वृत्त मात्र चुकीचे असल्याचे डॉ. देशमुख यांचे म्हणणे आहे.
त्यांच्यानुसार, युहानमध्ये सर्वात जास्त नागरिक ‘ए’ आणि ‘ओ’ रक्तगटाचे आहेत. यामुळे तिथे तो अभ्यास झाला असलातरी भारतात तो लागू होईल असे नाही. तसेच या संदर्भातील प्रसिद्ध झालेली आकडेवारी वेगवेगळ्या ग्रुपवर वेगवेगळी आहे. महत्वाचे म्हणजे, या वृत्ताला घेऊन कुठलेही पुरावे सादर करण्यात आलेले नाहीत.
यामुळे कुठलाही रक्तगट असला तर प्रतिबंधात्मक उपाययोजना न केल्यास या रोगाची लागण होण्याची शक्यता असतेच. ‘जर तुमचा ‘ए’रक्तगट असेल तर घाबरून जाण्याचे कारण नाही, कारण कोरोना केवळ याच रक्तगटालाच होतो असेही पुरावे नाहीत. ‘ओ’ रक्तगट असणाऱ्या कोरोना होत नाही, ते पूर्णपणे सुरक्षित आहेत, असेही नाही. जर तुमची रोगप्रतिकारशक्ती चांगली असेल, तुम्ही वारंवार हात धुवत असाल, स्वच्छता राखत असाल तर कोरोनाला घाबरण्याची गरज नाही. मात्र खबरदारी घेणे आवश्यक आहे, असेही डॉ. देशमुख म्हणाले.