किराणा दुकानदार देणार घरपोच सेवा | Full list
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकारातून नागरिकांसाठी व्यवस्था
नागपूर, ता. २६ : ‘कोरोना’ चा प्रसार रोखण्यासाठी नागपुरात ‘लॉकडाऊन’ घोषित करण्यात आले आहे. यादरम्यान अत्यावश्यक सेवांचे दुकान सुरू असले तरी नागरिकांचा घराबाहेर पडण्याचा त्रास वाचविण्यासाठी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घरपोच किराणा मिळण्याची व्यवस्था केली आहे. फोन करा आणि किराणा घरपोच मिळवा अशी ही व्यवस्था आहे.
नागपूर महानगरपालिकेअंतर्गत असलेल्या दहाही झोनमधील सुमारे ४५ दुकानदारांनी ही व्यवस्था केली आहे. अशी व्यवस्था व्हावी यासाठी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्वतः पुढाकार घेतला. नागरिकांच्या सोयीसाठी आणि नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी पुढाकार घेणारी नागपूर महानगरपालिका राज्यात पहिली ठरली आहे. नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्वतः मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. घरपोच किराणा सामान पोहचविणाऱ्या दुकानांची यादी परिसराचे नाव आणि मोबाईल क्रमांकासह मनपाच्या अधिकृत फेसबुक पेजवर उपलब्ध आहे.
याव्यतिरिक्त प्रत्येक झोनमधील जी अत्यावश्यक सेवांची दुकाने सुरू आहेत, त्या दुकानांसमोर सामाजिक अंतर ठेवण्यासाठी मनपा व्दारे तीन-तीन फुटांवर गोल खुणा करण्यात आल्या आहेत. त्यानुसारच ग्राहकांना उभे राहायचे आहे. कोरोनासंदर्भात आवश्यक उपाययोजनांवर मनपा प्रशासन भर देत असून याअंतर्गत ही व्यवस्था करण्यात आली आहे.
घरपोच सेवा देणारी दुकाने
घरपोच सेवा देणा-या किराणा दुकानांची यादी
स्वस्त वस्तू भंडार (धरमपेठ), कृष्ण काशीनाथ वाघमारे (धरमपेठ), गोपाल जनरल स्टोर्स (धरमपेठ), महाराष्ट्र कंझुमर्स फेडरेशन (धरमपेठ), हिलटॉप किराणा स्टोर्स (सेमिनरी हिल्स), जितेंद्र धान्य भंडार, महेश ट्रेडर्स, युनिटी किराणा स्टोर्स, संजय धान्य भंडार (सर्व गोकुलपेठ), हरिओम किराणा (आशीर्वाद नगर, हुडकेश्वर), रक्षक बंधु सुपर बाजार (तुकडोजी चौक), पवन ट्रेडर्स, गुप्ता ट्रेडर्स (दोन्ही हुडकेश्वर पोलिस ठाण्याजवळ), सुरज किराणा स्टोर्स (इंद्रिया नगर), शाहू किराणा भंडार (रामबाग मेडिकल चौक), गुरुनानक ट्रेडर्स, काश्मीर किराणा स्टोर्स (दोन्ही कॉटन मार्केट), पारसमणी किराणा (,बैद्यनाथ चौक), सागर डेअरी (कॉटन मार्केट), श्री भोले किराणा अँड जनरल स्टोर्स (इमामवाडा), बांते सुपर बाजार (भगवान नगर), प्रकाश किराणा (बालाजी नगर), महालक्ष्मी ट्रेडर्स (न्यू बालाजी नगर), शक्ती किराणा (कुकडे ले आऊट), मोहित किराणा स्टोर्स (हुडकेश्वर पोलिस स्टेशन जवळ), आकाश केवलरामानी किराणा दुकान (गांधीबाग), ज्ञानेश्वर डहाके दूध डेअरी (गांधीबाग), आर.के. किराणा स्टोर्स (इतवारा), वल्लभदास प्रेमजी किराणा (इतवारा), शाहू धान्य भंडार (कळमना मार्केटजवळ), धैर्य किराणा ॲण्ड धान्य भंडार (दुर्गा नगर भरतवाडा), नीलेश मार्केटिंग ॲण्ड डेअरी (न्यू हनुमान नगर भरतवाडा), चंदु किराणा स्टोर्स (भरतवाडा), राजेश किराणा स्टोर्स (सतनामी नगर), जनचिझ डेली निडस् (वर्धमान नगर), श्री किराणा स्टोर्स (पूर्व वर्धमान नगर), श्री चक्रधर स्वामी किराणा (देशपांडे ले-आऊट), विशाल किराणा स्टोर्स (सन्याल नगर, नारी रोड), श्री गुरु गोविंदसिंगजी सेवादल (उत्तर नागपूर), मुरली किराणा स्टोर्स (छावणी), जैस ट्रेडिंग कंपनी ॲण्ड जैस किराणा स्टोर्स, शीव शॉपी किराणा अनाज सप्लायर, राज किराणा, नंदु पट्टू गुप्ता किराणा स्टोर्स, राजलक्ष्मी दूध डेअरी (सर्व गड्डीगोदाम, गोलबाजार) आदी ४५ दुकानातून घरपोच सेवा मिळेल.