COVID-19InformativeNagpur Local
कोरोना विषाणू या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये, या करीता उपाययोजना म्हणून शासनाचे पुढील आदेशापर्यंत आठवडी बाजार स्थगित ठेवलेला असून
कोरोना विषाणू या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये, या करीता उपाययोजना म्हणून शासनाचे पुढील आदेशापर्यंत आठवडी बाजार स्थगित ठेवलेला असून, इतर दिवशी भरणारा गुजरी बाजार विविध वार्डातील चौकामध्ये भरविण्यात येत होते. मात्र सादर ठिकाणी देखील गर्दीचे प्रमाण वाढत असल्याने दिनांक ५ एप्रिल २०२० पासून पुढील आदेशपर्यंत गुजरी बाजार कृषी उत्पन्न बाजार उपसमिती, कुही मैदानात भरविण्यात येत आहे.
गुजरी बाजारात किरकोळ भाजीपाला विक्री करणार्यांना नगर पंचायत मार्फत दुकान लावण्याचे लेखी पत्र दिले आहे. अश्याच भाजीपाला विक्रेत्यांना सदर ठिकाणी बसण्याची परवानगी दिल्या जाणार असून या वेतिरिक्त इतर भाजीपाला विक्रेते यांना शहरात भाजी विक्री करता सक्त मनाई करण्यात येत आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
तसेच गर्दी होऊ नये म्हणून भाजीपाला खरेदी करिता येणाऱ्या फक्त एकच वेक्तीस प्रवेश दिला जाणार असून बाहेर गावातील विक्रेत्यांना शहरात कुठेही भाजीपाला विक्री करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.