Nagpur LocalNagpur Police
कोरोना संदर्भात व्हॅटसअँप वर अत्यंत बेजबाबदार तसेच दिशाभूल करणाऱ्या आडिओ क्लिप बाबत
सदर पोलिस ठाणे येथे भादंवि 188, 505 व आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 54, नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या गुह्यातील 03 आरोपीना दि. 27 मार्च 2020 रोजी अटक करून मा. न्यायालयात हजर केले असता, माननीय न्यायालयाने 28 मार्च 2020 अखेर पोलीस कोठडी दिली होती, त्यानंतर त्यांना पुन्हा आज रोजी 28 मार्च 2020 रोजी माननीय न्यायालयात हजर केले असता त्यांना दिनांक 30 मार्च 2020 अखेर पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे. नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोरोना संदर्भाच्या अनुषंगाने, कोणत्याही प्रकारची फेक न्युज व्हाट्सअप वर किंवा इतर समाज माध्यमावर प्रसारित करू नये, अन्यथा अशा फेक न्युज प्रसारित करणाऱ्या व्यक्तींच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
नागपूर शहर पोलीस 💯