COVID-19
नागपुरात करोनाचा पहिला बळी गेला आहे. सतरंजीपुरा परिसरातील ६८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू काल झाला. त्याच्या घशातील स्त्रावाचा अहवाल आज पॉजिटिव्ह आला आहे.
मुख्य म्हणजे या व्यक्तीला कुठलीही परदेश प्रवासाची हिस्ट्री नाही. कम्युनिटी स्प्रेडमधून हा बळी गेल्याचे दिसून येत आहे. कम्युनिटी स्प्रेड ही स्टेज धोकादायक आहे. तेव्हा काळजी घ्या.
– घराबाहेर फारच आवश्यक असल्यास पडा.
– बाहेर जाताना मास्क वापरा.
– हात स्वच्छ धुवा.
– बाहेरून आल्यानंतर या अंगावरील कपडे लगेच धुतल्यास उत्तम.
– सर्दी, खोकला असल्यास तात्काळ डॉक्टरला दाखवा.