Nagpur Local

आजच्या ‘जनता कर्फ्यू’ प्रतिसादामुळे आयुक्त खूश, काय बोलले ते ऐका …

नागपूर:- कोरोना साथीच्या वाढत्या घटनांमध्ये कोरोना बाधित जिल्ह्यांमध्ये लॉकडाउन किंवा सार्वजनिक कर्फ्यू अशा उपाय योजना लागू करण्यात येत आहेत. नागपूर जिल्ह्यातही आज आणि उद्या असे दोन दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्याच्या मुंढे व जोशी यांचे घोषणेचा नागपूरच्या रस्त्यावर सकारात्मक परिणाम दिसून आला.

नागपूर शहरात रस्ते वैरान झाले आढळले. लोकांची अजिबात वर्दळ नव्हती परंतु पोलिस उपस्थित होते, पोलिसांनी एकट्या दुकट्या आढळणा-या व्यक्तीची चौकशी राखली, या दोन दिवसाच्या कर्फ्यूच्या पहिल्याच दिवशी सर्व बाजारपेठा कडकडीत बंद ठेवण्यात आल्या होत्या आणि जनताही स्वत:हून घरात कैद झाली.

नागपूरकरांच्या स्वभावावर शहरात लॉकडाऊन व कर्फ्यूचा वारंवार इशारा देणारे मनपा आयुक्त म्हणाले की, आज कर्फ्यूला जनतेचा चांगलाच पाठिंबा मिळत आहे. असाच जागरूक भाव राखल्यास लॉकडाऊन वा कर्फ्यु लावण्याची आवश्यकता पडणार नाही.

25 व 26 जुलै रोजीच्या या 2 दिवसीय ‘जनता कर्फ्यू’ दरम्यान नागपूर शहरातील केवळ आवश्यक सेवा चालविण्यासच परवानगी आहे. ज्यामध्ये आरोग्याशी संबंधित सेवांसह अन्य आवश्यक आणि आपत्कालीन सेवा कार्यरत राहतील आणि जनतेला घराबाहेर न जाण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

Nagpur Updates

Nagpurupdates is your local/Digital news, entertainment, Events, foodies & tech website. We provide you with the happening news, Page3 Contain and all about Nagpur Foodies & Infrastructure from the Nagpur and world.

Related Articles

Back to top button
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Adblock Detected

Disable Your Add Block To View Page.