बुटीबोरी येथे नि:शुल्क् आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
नागपूर:-कोरोना विषाणू चा वाढता प्रादुर्भाव बघता संपूर्ण देशात व राज्यात संचारबंदी व लॉक डाऊन ची घोषणा करण्यात आली.त्यामुळे जीवनावश्यक सेवा व्यतिरिक्त सर्वच उद्योग,कारखाने,दुकाने बंद असून सर्व जनता घरामध्ये होम कोरोन्टीन झाले आहे.
परंतु त्यानंतरही बुटीबोरीतील जनतेला कुठल्याही नागरी सुविधांचा त्रास सोसावा लागू नये म्हणून जनतेच्या सुखासाठी दिवसभर घराबाहेर राहणाऱ्या नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे स्वास्थ्य बिघडू नये म्हणून महाकाली फौंडेशन ने सामाजिक भान ठेवून आज दि ०८ एप्रिल ला नि:शुल्क आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिबिरात १५० नगरपरिषद कर्मचाऱ्यांची सामान्य तपासणी करून औषध देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाकाली फौंडेशन च्या अध्यक्ष रिता कुटे यांनी, तर आभार पाणी पुरवठा सभापती मंदार वानखेडे यांनी मानले. आरोग्य शिबिराच्या यशस्वी करण्यासाठी सर्वश्री कल्पना आंबूले,भारती कोडग,माधुरी सातपुते,भावना सेनगर,गौरी उंबरकर,दिनेश कुटे,मनोज आंबूले,तसेच नगरपरीषदच्या पाणी पुरवठा कर्मचाऱ्यांनी मोलाचे परिश्रम घेतले.
या शिबिराला प्रामुख्याने बुटीबोरी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष बबलू गौतम,भाजप जिल्हा उपाध्यक्ष आकाश वानखेडे,स्वच्छता सभापती अनिस बावला, शिक्षण सभापती विनोद लोहकरे,नियोजन सभापती मुन्ना जैस्वाल,मनोणीत नगरसेवक प्रवीण शर्मा,मंगेश आंबटकर व सर्व नगरसेवक प्रामुख्याने उपस्थित होते. या आरोग्य शिबिरात डॉ इंगळे यांनी संपूर्ण कर्मचाऱ्यांची तपासणी केली.