COVID-19Nagpur Local

भाजीपाला विक्रीसाठी शेतकऱ्यांना शहरातील विविध भागात जागा उपलब्ध

नऊ झोनमध्ये किरकोळ विक्रेत्यांसाठी आयुक्तांनी केली व्यवस्था
शहरामध्ये येऊन भाजीपाला विक्री करणा-या शेतकऱ्यांना नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील विविध भागात विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शहरातील दहापैकी नऊ झोनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या ठिकाणी घरोघरी जाऊन विक्री करणारे किरकोळ विक्रेत्यांसाठी बुधवार दि. १ एप्रिल, २०२० पासून ही व्यवस्था होणार आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर कॉटन मार्केट बंद करण्याचा निर्णय नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतला. त्यामुळे कॉटन मार्केटमध्ये येणा-या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना शहरात भाजीपाला विक्रीस अडचण निर्माण होत होती. यावर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पुढाकार घेत दहाही झोनमधील जागांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून मागविली. शहरातील दहापैकी सतरंजीपूरा झोन वगळता इतर नऊही झोनमध्ये शेतकऱ्यांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ठिकाणी घरोघरी जाऊन भाजी विक्री करणारे किरकोळ विक्रेतांनी सुरक्षेची काळजी घेत भाजीपाला खरेदी करावी, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने विक्रेत्यांसाठी मनपातर्फे काही अटी निर्धारित करण्यात आल्या आहेत. या अटींची पूर्तता करणा-यांनाच विक्रीसाठी परवानगी दिली जाणार आहे. आयुक्तांनी पोलिस विभागाला आणि आर.टी.ओ. ला सुध्दा नियंत्रण ठेवण्याचे निर्देश दिले आहे.

अशा आहेत अटी
– सोशल डिस्टेसिंगच्या पालन करावा
– गर्दी होऊ नये म्हणून मार्किंग केली जाईल.
– मास्क, सॅनिटायजरचा वापर बंधनकारक
– आरटीओ नियमाप्रमाणे वाहनाची सर्व कागदपत्रे सोबत असणे आवश्यक
– वाहन चालकाचा परवाना जवळ असणे आवश्यक
– वाहन चालकास खोकला, ताप, सर्दी आदी जाणवल्यास त्याने तात्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात तपासणी करून घेणे बंधनकारक
– सदरचे वाहन भाजीपाला मालाव्यतिरिक्त इतर वाहतुकीस वापरता येणार नाही

झोन निहाय उपलब्ध जागा

लक्ष्मीनगर झोन – जयताळा आठवडी बाजार.
धरमपेठ झोन – रामनगर मैदान, यशवंत स्टेडियम.
हनुमान नगर झोन – रेशिमबाग मैदान, कलोडे महाविद्यालय बेलतरोडी रोड इंद्रप्रस्थ सोसायटीची जमीन, श्री.ढगे यांच्या बंगल्याजवळ पिपळा रोड.
धंतोली झोन – उंटखाना मैदान टाटा कॅपिटल हाईट समोर, राजाबक्षा मैदान, भगवान नगर मैदान पोस्ट ऑफिसजवळ, बालाजी नगर
मैदान वेलू कॉर्नरजवळ, रेणुका विहार कॉलनी मैदान, नरेंद्र नगर एन.आय.टी. मैदान.
नेहरूनगर झोन – आशीर्वाद नगर एन.आय.टी. बाजार, श्रीनगर मैदान दर्शन कॉलनी, ताजबाग रोड भविष्य निर्वाह कार्यालयापुढील जागा.
गांधीबाग झोन – दिघोरीकर मैदान जुना बगडगंज, मनपा शाळा नवी शुक्रवारी मॉडेलमिल चौक गाडीखाना.
लकडगंज झोन – सरदार वल्लभभाई पटेल मैदान कच्छीविसा भवन जवळ सतनामीनगर, भास्कर व्यास मैदान पूर्व वर्धमान नगर.
आसीनगर झोन – एच.आर. कॅन्सर हॉस्पिटल कळमना रिंग रोड, दीपक नगर उप्पलवाडी रोड.
मंगळवारी झोन – नारा रोड उजव्या बाजूला नारा, क्रिष्णाधाम झिंगाबाई टाकळी, गुमान लॉन गोरेवाडा.

Nagpur Updates

Nagpurupdates is your local/Digital news, entertainment, Events, foodies & tech website. We provide you with the happening news, Page3 Contain and all about Nagpur Foodies & Infrastructure from the Nagpur and world.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
Best Wordpress Adblock Detecting Plugin | CHP Adblock

Adblock Detected

Disable Your Add Block To View Page.