‘यूपीएचसी’चे नागपूर मॉडेल आता छत्तीसगडमध्ये’
टाटा ट्रस्टच्या सहकार्याने मनपाच्या १८ नागरी प्राथमिक सुविधा केंद्रांचा चेहरामोहरा बदलविण्यात आला. अत्याधुनिक उपकरणे, रक्तांचे नमूने तपासणीसाठी अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब यामुळे नागरिकांना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. नागपूर महानगरपालिकेमध्ये राबविण्यात आलेले हे मॉडेल आता छत्तीसगडमध्ये राबविण्यात येणार आहे.
टाटा ट्रस्टतर्फे छत्तीसगडमधील कार्याला सुरूवात झाली असून रायपूर शहरातील गुडियारी नागरी प्राथमिक आरोग्य सुविधा केंद्राचे गुरूवारी (ता.५) छत्तीसगड राज्याचे आरोग्य मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. रायपूर येथे जाउन डॉ. बुरे, इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिचारिका सिल्वीया, फार्मसिस्ट अंकिता यांनी नागपुरातील प्रकल्पासंदर्भातील माहिती दिली. छत्तीसगड येथील संपूर्ण प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी टाटा ट्रस्टची संपूर्ण चमू सहकार्य करीत आहेत.