InformativeNagpur Local
सम्राट अशोक कॉलोनी काशीनगर, रामेश्वरी रहिवासी कृती समिती व सम्राट अशोक काॅलोनी बुद्ध विहार समिती
गेल्या अनेक वर्षांपासून काशिनगर येथील सम्राट अशोक कॉलोनी परिसरात दर सोमवारला अनअधिकृत साप्ताहिक बाजार भरत आहे. याबाबत अनेक वर्षांपासून स्थानिक नागरिक महापौर, मनपा आयुक्त, पोलिस आयुक्त, झोनल अधिकारी, आरोग्य अधिकारी, अजनी पोलिस निरीक्षकांना वारंवार निवेदन आणि तक्रार करूनही निराकरण करण्यात आले नाही. या भागात आठवडी बाजाराने केलेल्या अतिक्रमणामुळे येथील जनतेचे आरोग्यासह गुन्हेगारी घटनांमुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. शहरात सध्या लोक वस्तीत ठिय्या मांडून बसणाऱ्या अनाधिकृत बाजारांवर कारवाई करण्यात येत आहे. मनपा प्रशासनाच्या ही कारवाई अभिनंदनास पात्र आहे.
आज सोमवारी वस्तीतील नागरिकांनी एकत्र होऊन बाजार बंद करण्यास पुढाकार घेतला. सकाळपासून वस्तीतील नागरिक बाजार बसू दिले नाही