सर विश्वेश्वरय्या औद्योगिक राष्ट्रीय संस्थेच्या काढलेल्या १७० कर्मचा-यांचे आंदोलन
नागपूर:- सर विश्वेश्वरय्या औद्योगिक राष्ट्रीय संस्थे (वि एन आय टी) द्वारे नव्या एजंसीचे कंत्राट आल्याने शहरातील माटे चौकात वि एन आय टी गेटसमोर जय जवान जय किसान संघटनेद्वारे 170 कर्मचाऱ्यांच्या बडतर्फी रद्द करण्याबाबत आज आंदोलन करण्यात आले.
वि एन आय टी तील निवड समिती आणि प्रशासनाने याची दखल घेऊन याबाबत योग्य ती कारवाई शिघ्रतेने न केल्यास हे आंदोलन अधिक तिव्र करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला.
संघटनेचे प्रवक्त्यांनी ही गेटमीटिंग निदर्शक म्हणून, इशा-यादाखल असल्याचे माध्यमांस सआंगितले, उद्या दुसऱ्या दिवशी श्रम आयुक्तां सोबत संघटनेची या विषयावर बैठक होणार आहे व बडतर्फ सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांचेच बाजूने निकालाचीही अपेक्षा असल्याचे सांगीतले, व्हि एन आईटी मैनेजमेंट कुणाचे दबावात काम करत असे निर्णय घेत आहे की आजच्या या महामारी प्रसार काळाची सर्वांची परिस्थिती आधीच फार गंभीर आहे, कोरोनामुळे श्रीमंत पासून गरिबांपर्यंत हाताला काम नाही,आधीच बेरोजगारी आपल्या चरम पदावर आहे पगार नसलेल्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे मात्र याच काळात व्हीएनआयटी १७० कर्मचा-यांस वा-्यावर सोडत आहे संस्था प्रशासन दखल घेत नसल्यास हे आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला, सदर संस्था ही केंद्र सरकारचे अखत्यारीत येते, राज्याचे गृहमंत्री ही आमचे पाठी असल्याचे त्यांनी आम्हाला कळवले आहे व संपूर्ण राष्ट्रवादी या आंदोलनात संघटनेपाठी राहील व न्याय मिळेपर्यंत पाठपुराला राखील असे यावेळी प्रवक्त्यांनी सांगीतले