आज दि. ०४/०४/२०२० रोजी युनिट १ पथकातर्फे पोलीस निरीक्षक मुक्तार शेख यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोस्टे हद्दीत बाक्षे मेडिकल अॅण्ड जनरल स्टोअर्स येथे ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा जास्त दराने मास्क ची विक्री होत असल्याचे दिसून आल्याने सदर मेडिकल चालकावर पुरवठा निरिक्षक यांचे वतीने MIDC पोस्टे येथे अत्यावश्यक वस्तू सेवा अधिनियम १९५५ चे कलम १०चे उपकलम ३ (२),(क) चे उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल करून सदर मुद्देमाल पुढील कारवाईस्तव पोलीस स्टेशनच्या स्वाधीन करण्यात आला आहे .