केयर; नागपूर शहर पोलिस (CARE:Counselling and Reformative Education Center )
विधीसंघर्षग्रस्त बालकांच्या हक्कांचे संरक्षण व पुनर्वसन करण्यामध्ये सातत्य रहावे यादृष्टीने नागपूर पोलीस आयुक्तालय स्तरावर गुन्हे शाखा अंतर्गत C.A.R.E. ( Counselling and Reformative Education Center ) दिनांक ०८ / ०९ / २०१८ रोजी स्थापन करण्यात आले .
मा . पोलीस आयुक्त यांनी विधी संघर्षग्रस्त बालकांच्या हक्कांचे संरक्षण व पुनर्वसन करण्याचा कल्याणकारी उपक्रम गहनतेने घेतल्यामुळे गेल्या वर्षभरात बालकांच्या गुन्हेगारीचे प्रमाण ५० टक्क्याने कमी झालेले आहे.
C.A.R.E. उपक्रमा अंतर्गत नागपूर शहर पोलीस आयुक्तालया अंतर्गत लगेचच येणाऱ्या होळीच्या सणाचे औचित्य साधून विधीसंघर्षग्रस्त बालकांकरीता विशेष कार्यक्रम दिनांक ०७/०३/२०२० रोजी सायंकाळी ०५.०० वाजता पोलीस जिमखाना सिव्हील लाईन्स नागपूर येथील लॉन वर आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमास जवळपास ३०० विधीसंघर्षग्रस्त बालक व ईतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
विधी संघर्षग्रस्त बालकांकरीता आयोजित या विशेष कार्यक्रमास आपण आवर्जुन उपस्थित राहून या बालकांचा गुन्हेगारी जगता पासून दूर राहण्याच्या संकल्प दृढ करूया. आपणास आग्रहाचे निमंत्रण !!
पोलिस आयुक्तालय, नागपूर