क्रेडिट कार्ड वापरताय? या गोष्टींचे भान ठेवले नाही तर मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार !
आजच्या काळात क्रेडीट कार्ड वापरणाऱ्यांच्या संख्येत खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. त्यामुळे पैसे सोबत ठेवायची गरज भासत नाही.
आपल्या खिशामध्ये आत्ता पूर्ण पैसे नसले तरी देखील आवश्यक गोष्टीसाठी क्रेडिट कार्ड कंपनीकडून उरलेले पैसे लगेच वापरायला मिळतात आणि हे पैसे ४०-४५ दिवस बिनव्याजी वापरता येतात पण ह्या क्रेडीट कार्डचे जेवढे उपयोग आणि फायदे आहेत तेवढेच त्याचे तोटे देखील आहेत.म्हणजे जर क्रेडीट कार्ड वापरत असताना काही गोष्टींचे भान ठेवले नाही तर तुम्हाला खूप मोठ्या समस्येला समोर जावे लागू शकते.त्यामुळे क्रेडीट कार्ड वापरत असताना कुठले नियम पाळायला हवे ते जाणून घेणे गरजेचे आहे.
आपल्या क्रेडीट कार्डची माहिती कुणाही बरोबर कधीही शेअर करू नये. फोन वरून किंवा ऑनलाईन पेमेंट करत असताना सावधानता बाळगणे खूप गरजेचे आहे. कारण ह्या दरम्यान थोडी देखील चूक झाली तर तुमचे खूप नुकसान होऊ शकते.सध्याच्या जगात पासवर्ड हॅकिंग आणि डेटा चोरी सारख्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसून येते. म्हणून आपले क्रेडीट कार्ड सावधपणे वापरणे गरजेचे आहे.
जर तुम्हाला वाटत असेल की एकाहून जास्त क्रेडीट कार्ड सोबत ठेवल्याने तुम्हाला फायदा होतो, परंतु खोलवर विचार केला तर यामध्ये जास्त नुकसान आहेत.सर्वात पहिली समस्या म्हणजे, अनेक क्रेडीट कार्ड असल्या कारणाने आपल्याला हे लक्षात रहात नाही की कुठल्या क्रेडीट कार्डचे पेमेंट किती आणि कधी करायचे आहे.
जर पेमेंट करायला उशीर झाला तर तुमचा क्रेडीट स्कोर खराब होईल, क्रेडीट स्कोर खराब असला तर बँक आपल्याला आणखी क्रेडीट कार्ड किंवा लोन देत नाही.भारतामध्ये आता सिबिल नावाची क्रेडिट रेटिंग एजन्सी सुरू झाली आहे, ही संस्था प्रत्येक माणसाची पत म्हणजेच क्रेडिट स्कोअर मोजत असते.सिबिल स्कोर जितका जास्त, तितकी त्या व्यक्तीची पत अधिक, त्यामुळे त्या व्यक्तीला कोणतेही लोन (हाऊसिंग लोन, पर्सनल लोन) मिळताना कमी अडचणी येतात, आणि जितका स्कोर कमी त्यानुसार त्या व्यक्तीला कोणतेही लोन घेण्यास जास्त अडचण अथवा जास्त व्याजदर द्यावा लागतो.तसेच तुमची क्रेडीट लिमिट कमी केली जाते.जर प्रवासादरम्यान तुम्ही एकाहून अधिक क्रेडीट कार्ड सोबत ठेवत असाल तर ते हरविण्याची किंवा चोरी होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे देखील तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.ज्यांनी नवीनच क्रेडीट कार्ड वापरायला सुरवात केली आहे अश्या लोकांसोबत एक गोष्ट नेहमी घडते, ती म्हणजे हे लोक क्रेडीट कार्डचे पेमेंट करायला विसरतात.
क्रेडीट कार्ड वापरणे हे जरी सोप्पे वाटत असले तरी त्याच्या काही गोष्टी माहित असणे गरजेचे आहे. जसे की, पेमेंट टायमिंग आणि इंटरेस्ट.
अनेक बँका ह्या पेमेंट करिता ५० दिवसांचा कालावधी देतात पण जर क्रेडीट कार्डचे पेमेंट करायला विसरलो तर बँक आपल्याकडून अतिरिक्त इंटरेस्ट आकारते.ड्यू डेट आणि आउटस्टॅडिंग बॅलन्स यांच्याशी संबंधित माहिती बँक संदेश पाठवून देत असते. ज्यामध्ये बँक कमीत कमी शिल्लक देण्याचा पर्याय देते. एखादेवेळी पैसे कमी असले तर कमी अमाउंट देऊन पेमेंट टायमिंग वाढवता येते. पण नेहमी असे केल्याने पेमेंट चे पैसे त्यावर लावण्यात आलेल्या व्याजामुळे नेहमी वाढत राहील.प्रत्येक बँक आपल्या क्रेडीट कार्ड धारकाला हा अधिकार देते की, तो क्रेडीट कार्डच्या मदतीने देखील एटीएममधून पैसे काढू शकेल. पण तुम्ही एकावेळी जेवढे पैसे काढाल त्यावर बँकेकडून रोज व्याज घेतले जाईल. जे तुम्हाला खूप महागात पडू शकते.त्यामुळे क्रेडिट कार्डवर एटीएम मधून कॅश काढणे ही सुविधा जरी दिलेली असली तरी ती अत्यंत इमर्जन्सी च्या वेळेसच वापरणे हितकर राहते.अशा पद्धतीने काढलेल्या पैशांवर क्रेडिट कार्ड कंपनी आपल्याला दर दिवशी दोन ते तीन टक्के व्याजदर लावते याचा अर्थ महिन्याचे 40 ते 60 टक्के व्याज! आणि हे आपल्याला एटीएम मधून काढलेल्या पूर्ण रकमेवर भरावे लागते.जर तुम्ही क्रेडीट कार्डाने कुठले मोठे पेमेंट करत असाल किंवा इएमआयवर कुठली मोठी वस्तू खरेदी करत असाल तर त्याचे पेमेंट देताना द्याव्या लागणाऱ्या व्याजाबाबतही एकदा विचार करा आणि ती वस्तू त्याच्या दर्शनी किंमती सोबतच त्यावर भरलेल्या व्याजा नंतर केवढ्याला पडेल याचे गणित एकदा नक्की समजून घ्या आणि मगच ती वस्तू आता घ्यायची की नाही ते ठरवा.अमेरिकेसारखी आर्थिक महासत्ता, परंतु त्या देशातील लक्षावधी लोक हे क्रेडिट कार्डवर असलेल्या अब्जावधी डॉलर्सच्या कर्जामध्ये दबलेले आहेत.क्रेडिट कार्ड महिन्याचे पेमेंट हे दोन स्वरूपात असतात, एक – किमान भरावयाची रक्कम आणि दोन – त्या महिन्यात देण्याची पूर्ण रक्कम.क्रेडिट कार्ड कंपनी आपल्याला 45 ते 50 दिवसांचा कालावधी देते या कालावधीनंतर आपण पूर्ण रक्कम भरणे हेच हितावह कारण त्यापुढे गेलेला एक एक दिवस आपल्यावर 20 ते 30 टक्क्यांच्या व्याजाचा डोंगर उभा करत असतो.क्रेडीटकार्डने जरी आपले जीवन सुखकर आणि सोयीस्कर केले असले तरी त्याचे फायदे आणि तोटे नीट जाणून मगच ते वापरणे गरजेचे आहे.