COVID-19InformativeNagpur Local
ग्रामीण पोलीस दला कडील अधिकारी व कर्मचारी यांचे साठी 200 लिटर ह्यांड स्याणिटायझरचा नागपूर डिस्ट्रीलरी च्या वतीने निःशुल्क पुरवठा करण्यात आला.
नागपूर : ग्रामीण पोलीस दला कडील अधिकारी व कर्मचारी यांचे साठी 200 लिटर ह्यांड स्याणिटायझरचा नागपूर डिस्ट्रीलरी च्या वतीने निःशुल्क पुरवठा करण्यात आला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप साहेब यांच्या प्रेरणेने व जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या मान्यतेने तसेच नागपूर डिस्ट्रीलरी या सद्या बंद असलेल्या दारु उत्पादक घटकांने ह्यांड स्यानिटायझरची निर्मिती केली व विभागीय उपायुक्त मोहन वर्दे यांचे शी चर्चा करुन 20 हजार लिटर निःशुल्क हॉस्पिटल व पोलीस तसेच अन्न वितरण व डेअरी अश्या गर्दीचे ठिकाणी वाटप करण्याचे नियोजन केले. आज नागपूर जिल्हा ग्रामीण पोलीस चे अधिकारी व कर्मचारी यांचे साठी राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रमोद सोनोने व निरीक्षक रावसाहेब कोरे यांनी 200 लिटर ह्यांड स्यानिटायझर पोलीस उप अधीक्षक (गृह) नागपूर जिल्हा ग्रामीण पोलीस संजय पुरंदरे यांचे कडे सुपूर्त केला.