Uncategorized
चटकदार मॅगी सॅन्डविच तुमच्या लाडक्यांसाठी
जाणून घ्या कृती
मॅगीची एक खासियत अशी कि ती सगळ्या वयोगटातील लोकांना आवडते, तर याच आपल्या लाडक्या मॅगीचे सॅन्डविच करून पाहिलंय का कधी? नसेल तर नक्की करून पहा:
साहित्य :
मॅगी
मस्टर्ड सॉस
केचप
चिली सॉस
मेयोनिज
ब्रेड स्लाइस
सॅलडची पाने
कांदा
टोमॅटो
चीज
कृती
▪ तुमच्या नेहमीच्या पद्धतीने मॅगी करून घ्या. फक्त ती कोरडी करा. आता मेयोनिजमध्ये मस्टर्ड सॉस, केचप आणि चिली सॉस घालून मस्त मिश्रण बनवा. मॅगी मसालेदार करत असाल तर नुसतेच मेयोनिज वापरा.
▪ सॉसचा वापर टाळा. आता ब्रेड स्लाइसला मेयोनिजचे मिश्रण लावून घ्या. त्यावर सॅलडची पाने, कांदा, टोमॅटोच्या चकत्या ठेवा. त्यानंतर त्यावर मॅगी घाला. वर चीज किसून घाला किंवा चीजच्या चकत्या ठेवा.
▪ मग परत वर कांद्याची चकती लावा आणि ब्रेड स्लाइस लावून हे सँडविच बंद करा. आता ग्रील करा. झटपट आणि चविष्ट सँडविच तयार.