Nagpur Local

दारुबंदी गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करत नऊ आरोपी वर कारवाई केली

Nagpur updates:- राज्य उत्पादन शुल्क विभागाने शहरातील विविध भागात छापे टाकून रुपये 23 हजार 700/- किंमतीचा दारुबंदी गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करत नऊ आरोपी वर कारवाई केली. शहरातील जरीपटका, सदर, कपिल नगर, यशोधानगर व कळमना या पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांच्या तक्रारीच्या अनुषंगाने अधीक्षक प्रमोद सोनोने यांच्या आदेशानुसार निरीक्षक रावसाहेब कोरे यांनी कारवाई केली. यावेळी मोहा दारु 260 लिटर, देशी दारु 40 लिटर व दारुबंदी गुन्ह्यातील साहित्य जप्त करण्यात आले असून आरोपी नामे (१) शहनाज सैयद युसूफ खलाशी लाईन – सदर, (२) लिस्टीन लॉरेन्स स्टीफिन खलाशी लाईन – सदर, (३) जैनबी अब्दुल राशीदखान खलाशी लाईन – सदर, (४) निशिकांत ज्ञानदास वासनिक समता नगर – जरीपटका, (५) आनंद रमेश नायर – समता नगर – पो स्टे कपिल नगर, (६) संजय तुळशीराम पोर्णिकर गुलशन नगर, (७) श्याम मनोहर धकाते – कुंदनलाल गुप्तानगर, (८) दिलीप प्रल्हाद धकाते, बिनाकी मंगळवारी, (९) पुरुषोत्तम कृष्णराव मौहेकर न्यू बिनाकी मंगळवारी इत्यादी वर कारवाई करण्यात आली आहे. या विशेष मोहिमेत सहाय्यक दुय्यम निरीक्षक कवडू रामटेके व प्रशांत येरपुडे, जवान महादेव कांगणे, महिला जवान सोनाली खांडेकर व वाहन चालक राजू काष्टे व रवी निकाळजे यांनी सहभाग घेतला.

आवाहन : अवैद्य मद्य निर्मिती व विक्री संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क साधावा. (टोल फ्री क्रमांक 18008333333 व वाटसप क्रमांक 8422001133)

Nagpur Updates

Nagpurupdates is your local/Digital news, entertainment, Events, foodies & tech website. We provide you with the happening news, Page3 Contain and all about Nagpur Foodies & Infrastructure from the Nagpur and world.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

Adblock Detected

Disable Your Add Block To View Page.