नागपुरातल्या युवा डॉक्टर समीर अरबट यांचे इन्वेंशन – डॉक्टरांसाठी सेफ्टी बॉक्स
नागपुर-राज्यासह संपूर्ण देशात कोरेना बाधित रुगणांची संख्या झपाट्याने वाढत असून त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर नर्सेसला रुग्नांकडून कोरेना संक्रमनाचा धोका ही वाढला आहे. त्यामुळे कोरेना बाधितकडून डॉक्टर, नर्सेस ला संक्रमनाचा धोका होऊ नये यासाठी नागपुरातील क्रीम्स हॉस्पिटल चे इन्टरवेशनल पल्मोलॉजिस्ट डॉ. समीर अरबट यांनी अतिशय माफक दरात ब्रान्कोस्कोपी सेफ्टी बॉक्स तयार केले आहे.
कोरेना बाधित रुगनांच्या शिंकन्यामुळे किंवा खोकल्या मुळे डॉक्टरांना संक्रमनाचा धोका अधिक आहे । हा धोका कमी करण्यासाठी डॉक्टरांनी या सेफ्टी बॉक्स चा वापर केल्यास क्रॉस इन्फेक्शनचा होण्याचा धोका कमी करता येऊ शकत असल्याचे मत डॉ. समीर अरबट यांनी सांगितले आहे. या सेफ्टी बॉक्स ला 3 ऑपरेटर अपरचर लावण्यात आले असून प्लास्टिक शीट व्हाल्वने या बॉक्स ला कव्हर करण्यात आले आहे. या 3 अपरचर मधून कोरेना बाधित रुगनांवर उपचार केल्या जाऊ शकते. या सेफ्टी बॉक्स चे प्रात्यक्षिक गेल्या महिन्यात इटली मधे करण्यात आले असून इटली मधे आता या बॉक्स चा वापर डॉक्टर करीत असल्याने भारत सरकारने ही या बॉक्स चा वापर करावा अशी मागणी ही यावेळी डॉ. समीर अरबट यांनी दूरदर्शन ला बोलतांना केली आहे