COVID-19
नागपुरात अजून दोघे कोरोनाबाधित; एकूण संख्या १६; विदर्भ २१
Nagpur updates: कोरोनाबाधितांच्या व संशयितांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याचे चिंताजनक वास्तव समोर येत आहे. उपराजधानीत रविवारी दोन अजून नवे रुग्ण कोरोनाबाधितांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. या वाढीमुळे नागपुरातील कोरोनाबाधितांची संख्या आता १६ वर गेली आहे. विदर्भात ही संख्या २१ झाली आहे.
कोणाच्याही संपर्कात राहू नका असे प्रशासन व कायदा वारंवार सांगत असला तरी नागरिकांनी अद्याप तसे करणे मनावर घेतलेले दिसत नाही. बाजारपेठांमध्ये गर्दी असते. नागरिक फिरायलाही बाहेर पडतात. उत्साही मंडळी फेरफटका मारू पाहतात. अशाच कारणांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. नागपुरातील भाजीबाजार ३१ तारखेपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी आपला शेतमाल शहरात किंवा जवळच्या गावात जाऊन थेट विकावा असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.