नागपूरच्या खरेदी गर्दिचा फोटो नॅशनल वायरल,आयुक्तांनी भेट देऊन राबविल्या उपाय योजना
नागपूर: परवा सर्व प्रमुख न्यूज चैनल वर नागपूरच्या तुफान गर्दी चा व्हिडिओ व्हायरल झाला, कोरोना काळात सामाजिक अंतराचे पालनाचे नियमन होत नसल्याचे हे दृश्य सगळ्यांनी रंगवून दाखवले, जीवा परीक्षा खरेदी महत्वाची आहे काय? असा आशय त्यात होता. त्यानंतर तातडीने त्याची दखल घेत नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी सदर भागांचा चमुसह विशेष दौरा केला व गर्दी प्रतिबंध उपाययोजनांची पोलिस दला मार्फत व्यवस्था आरंभली.
वाहतूक दलाचे डिसीपी सारंग दाभाडे यावेळी सिताबर्डी, महाल ईत्यादी भागात पायी दौरा करत उपाययोजनांची पाहनी केली, सणासुदींत नागरिकांना खरेदी करताना कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी घेण्याची दलास सुचना व नागरिकांनीही सोशल डिस्टेंस पालनाची काळजी घ्यावी असे आवाहन आयुक्तांनी केले. ठाराविक कालावधीसाठी सदर भागांत वाहनांचे प्रवेशबंदी, एकमार्गी वहातूक अशा उपाययोजनांद्वारे बाजारपेठ भागांत खरेदीदारांस त्रास होऊ नये अशा अनेक उपाय योजना राबवण्यात आल्या आहेत.
आयुक्तांनी व्हेरायची चौक ते लोहापूल पर्यंत पदयात्रा केली. तसेच आयुक्तांनी बडकस चौक महाल भागालाही भेट दिली. नागरिक, खरेदिदार व दुकानदारांनीही कोरोना नियमांचे पालन करावे, मास्क परिधान व हॅन्ड सॅनिटायझर चा वापर करावा असे आवाहन केले. त्यासमवेतत उपद्रव शोध पथकाला सदर नियम पालन न करणा-यांस जबर दंड करण्याचे आदेश देण्यात आले.
त्यांचेसमवेत अतिरिक्त आयुक्त संजय निपाने, झोनचे सहायक आयुक्त होते. एन डि एस व मनपा उपद्रव शोध पथकाचे कर्मचारी बाजारांत तैनात करण्यात आले होते. आयुक्तांनी यावेळी सांगीतले कि मोठ्या बाजारपेठा जश्या बर्डी, ईतवारी, महाल या भागांत सणामुळे खरेदिदारांची गर्दि उसळते. कोरोनाचा पाश व परिस्थिति अद्याप निवळली नाही करिता यावर आवर असणे महत्त्वाचे ठरते, याचसाठी गर्दि प्रतिबंधक विवीध उपाय राबवले जात आहे. सायंकाळी काही मार्गांवर चारचाकी वाहनबंदी, एकमार्गी वाहतूक, पार्किंग मनाई, बॅरिकेड्स, अतिरिक्त जवानांची तैनाती वगैरे करून अनावश्यक गर्दिवर नियंत्रण राखले जातेय. व्यापा-यांनाही स्वत: व ग्राहकांकडून कोरोना महामारी प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावनी करवून, राबवून घेण्याचे आवाहन व जागरूकता केली जात आहे, ज्यामुळे सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले.