Breaking NewsNagpur Police
नागपूर पोलीस ‘ऍक्शन मोड’ मध्ये
राज्यात बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात आली.मात्र तरीदेखील नागरिक रस्त्यांवर विनाकारण फिरत असल्याचं अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे.
नागपुरात संचारबंदीच्या काळात विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस ‘ऍक्शन मोड’ मध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे. रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांची रस्त्यावरच रॅपिड अँटिजन चाचणी सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीच्या तीन नागरिकांपैकी दोन नागरिक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे या पॉझिटिव्ह आलेल्या लोकांची इन्स्टिट्यूशनल विलगीकरण केंद्रात रवानगी करण्यात आली आहे.