Informative
नागपूर महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागामार्फत पाच नवीन फवारणी गाड्या मनपाच्या सेवेमध्ये दाखल करण्यात आल्या आहेत

Nagpur updates:-या गाड्यांचे संदीप जोशी यांनी हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण केले. या गाड्या ‘रिमोट’ द्वारे नियंत्रित केल्या जातात. मशीन हाताळणीसाठी मनुष्यबळाची आवश्यकता नसून चालकच ‘रिमोट’द्वारे मशीनने फवारणी करू शकतो. लोकार्पण सोहळ्याप्रसंगी सत्तापक्ष नेते संदीप जाधव, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, नगरसेवक हरीश दिकोंडवार, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, आरोग्य उपसंचालक डॉ.भावना सोनकुसळे, हिवताप व हत्तीरोग अधिकारी जयश्री थोटे, हत्तीरोग अधिकारी दिपाली नासरे आदी उपस्थित होते.