बीजीआर वलोकार ज्वेलर्स प्रतिष्ठानाचे ऊद्घाटन
नागपूर- सराफा बाजार इतवारी येथील प्रसिद्ध व १८८२ सालापासून अविरत १३८ वर्षांची ग्राहकोपयोगी सेवा व परंपरा लाभलेल्या बीजीआर वलोकार ज्वेलर्स च्या वतीने नुकतेच चार मजली सुसज्जित व वातानुकूलित सोने-चांदी, हिरे-जवाहिरी दागिने व तसेच साडी आणि ड्रेस मटेरियल चे एकत्रीत व आधुनिक असे भव्य प्रतिष्ठानाचे ऊद्घाटन रविवार दि. ०२/०२/२०२० रोजी संपन्न झाले.
चार पिढ्यांपासन ग्राहकसेवेची परंपरा लाभलेल्या ह्या प्रतिष्ठानाने त्यांच्या ग्राहकांच्याही चौथ्या पिढीस जोडुन ठेवण्यात यश मिळवले आहे व त्याकरिताच आधुनिक मेगा स्टोर च्या धर्तीवर एका छताखाली सर्व सोईयुक्त सुविधाजनक खरेदी व सेवा देण्याच्या ऊद्देश्याने झपाटुन वलोकार परिवाराने ह्या शोरुमची निर्मीती केलीय.
सदर प्रतिष्ठानात तळमजल्यावर सुवर्णदालन तर प्रथम माळ्यावर चांदि अन डायमंड ज्वेलरी चे दालन आहे. द्वितीय माळ्यावर आधुनिक साडी व ड्रेसेस तर तृतीय माळ्यावर पारंपारिक साड्यांचे दालन अशी विवीध मजलेवार लिफ्ट सुविधेसह रचना करण्यात आली आहे. या विवीध दालनांचे टप्पे टप्पेवार ऊद्घाटन विवीध मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
वलोकार परिवारातील ज्येष्ठ सदस्य व सर्वांसाठी आदर्श अन प्रेरणास्थान असलेल्या मातोश्री श्रीमती शालीनीबाई भा. वलोकार तसेच नागपूरचे सर्वप्रिय खासदार व केंद्रीय मंत्री, भारत सरकार श्री. नितीनजी गडकरी, माजीऊर्जामंत्री श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे, आमदार श्री. गिरीशजी व्यास, स्वामिनारायण मंदिर नागपुर मंडळ चे आचार्य श्री. कोठारी पुज्य मुनिदर्शन स्वामी असे मान्यवरांनी ऊद्घाटनात सहभाग घेतला. याप्रसंगी संपुर्ण वलोकार कुटुंबिय, नातलग व हितचींतक तथा राजकिय व सराफाव्यवसाय क्षेत्रांतले अनेक मान्यवरांची उपस्थीती होती, सुवर्णकारसमाजी व संस्था कार्यकर्त्यांनीही प्रतिष्ठानाला आवर्जुन सदिच्छा भेट दिली. व खरेदि केली, पहिल्याच दिवशी साडी दालनात अपेक्षेपलिकडे विक्री झाली.
भैयाजी व गणपतराव वलोकार बंधुंनी १८८२ साली स्थापीलेल्या ह्या प्रतिष्ठानाचे प्रगतित स्व.भास्करराव ग. वलोकार, स्व.रमेश भा. वलोकारांनंतर सध्या श्री. प्रकाश भा. वलोकार, श्री. अनील भा. वलोकार व नव्या पिढितील श्री. अमोल र. वलोकार, श्री. संदिप र. वलोकार, श्री. अखील अ. वलोकार व राजस अ. वलोकार आपल्या सहकारयांसह यशस्वी धुरा सांभाळत आहेत. यासहच त्यांनी ईतर क्षेत्रातही व्यवसाय वृद्धि केलेली आहे.
नुकतेच डिसें २०१९ रोजी वलोकार ग्रुपचे ट्रिलियम मॉल कॉम्प्लेक्समधे “युएस पोलो” (U.S.Polo Assn.) ब्रॅन्ड स्टोरही ना. गृहमंत्री श्री अनिलजी देशमुख यांचे शुभहस्ते उद्घाटीत व ग्राहकसेवेत रूजू केले गेलेय, यासह “डेलसी”(Delsey) नावे हाई स्ट्रीट फिनिक्स, लोअर परेल, मुंबईत, तर २ वर्षांआधी नागपुरातच पुनम मॉल येथे “युएस पोलो/फ्लाईंग मशीन” (U.S.Polo Assn. , Flying Machine) नावेही रिटेल स्टोर कार्यरत आहे. यासह वडिलोपार्जीत पारंपारीक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत तो व्यवसायही फुलवीला, संत्रा/मोसंबी बागा, शेती, त्यासंबंधीत तांत्रीक बाबी, जलव्यवस्थापन व खतनिर्मीतीवर लक्ष केंद्रीत करून तसे प्रकल्प राबवीले परिसरातील शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी काटोलनजीक कुकडीपांजरा येथे ‘वलोकार कृषी केंद्र’ सुरू करून बी, बियाणे, खत, औषधी, शेतकी अवजारे पुरवठा त्याद्वारे होतो. नैसर्गीक खतनिर्मीतीसाठी ‘गांडुळ कल्चर प्रकल्पही’ सुरू केलेला आहे. तेथे फार्म हाऊससह नर्सरी ही निर्मिली आहे. यासमवेत नागपूर शहरात ‘विश्रांती लॉज’ हि सेंट्रल एव्हेन्यु मध्य वस्तीत सुसज्जीत लॉजही त्यांचे फर्मला समाविष्ठ आहे, वलोकार इंफ्रास्ट्रक्चर हि बांधकाम संबंधी शाखाही सुरू झालीय.