मंत्री मा.श्री. उदय सामंत यांना नागपूर विद्यापिठातील विद्यार्थ्यांना होणाऱ्या अनेक समस्या सोडविण्यासाठी निवेदन
नागपूर:- आज महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री मा.श्री.उदय सामंत यांच्या नागपूर आगमन दरम्यान आम आदमी पार्टी विद्यार्थी संघटना छात्र युवा संघर्ष समिती CYSS व आप युवा आघाडी नागपूर तर्फे नागपूर विद्यापीठाचा भोंगाळ कारोभार दुरुस्त करणे व विद्यार्थी मित्रांना होणाऱ्या अनेक समस्या सोडविण्यासाठी निवेदन देण्यात व दिल्ली आम आदमी पार्टी सरकार शिक्षण मंत्री मा. श्री. मनीष सिसोदियाजी प्रमाणे शिक्षण क्षेत्रात प्रमुख बदल आपल्या राज्यात सुध्दा तातडीने करण्याचे आव्हाहन करण्यात आले.
आम आदमी पार्टी विद्यार्थी संघटना CYSS तर्फे राज्य उपाध्यक्ष श्री. नेहाल बारेवार यांच्या नेतृत्वात खालील प्रमुख मुद्द्यावर शिक्षण मंत्री महोदयांन सोबत चर्चा करण्यात आली,
- स्टेट बोर्ड असो किंवा इतर कुठलेही बोर्ड असले तरी कोणत्याही प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाला पात्रता व स्थलांतर प्रमाणपत्र मागण्यात
येवू नये, - विज्ञान शाखा सोडली असता कोणत्याही शाखेतून १२ वी उत्तीर्ण विद्यार्थी इतर सर्वच अभ्यासक्रमासाठी नैसर्गिकरित्या पात्र ठरविण्यात
यावा. - आपले विद्यापीठ केवळ स्टेट बोर्डातून उत्तीर्ण होणाऱ्याच नव्हे तर केंद्र आणि राज्य सरकार कडून मान्यता प्राप्त सर्वच बोर्डांतील १२ वी उत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे, याचाही खुलासा करावा.
- पात्रता व स्थलांतर प्रमाणपत्र केवळ विद्यापीठ बदल होत असेल त्याच केस मध्ये लागू शकते, प्रथम वर्षाला आवश्यकता नसल्याचा खुलासा करावा,
- विद्यापीठ संबंधित स्थलांतर कशाला म्हणायचे याची परिभाषा / व्याख्या काय आहे, याचा खुलासा करण्यात यावा.
- या सत्रापासून जर कोणतेही महाविद्यालय प्रथम वर्षाला प्रवेश घेतांना पात्रता व स्थलांतर प्रमाणपत्राची मागणी करीत असेल तर त्वरित त्या महाविद्यालयांवर कार्यवाही करण्यात यावी.
- कला व वाणिज्य शाखेच्या अनुदानित महाविद्यालात पदवी व पदवीत्तर वर्गात त्री-भाषीय सूत्राचा अवलंब करून मराठी मध्यम असलेल्या वर्गात
इंग्रजी किंवा हिंदी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची व्यवस्था करावी. - विद्यापीठ आणि महाविद्यालये विद्यार्थ्यांना लुटण्यासाठी किंवा कर्मचारी, व्यवस्थापन यांच्या भल्यासाठी नसून केवळ विद्यार्थ्यासाठीच आहेत, याचे सर्वांना भान ठेवण्याचे आदेश द्यावेत.
- स्टूडेंट अड फंड या सुविधेचे फलक सर्व महाविद्यालयात लावणे अनिवार्य करावे.
- न्यायालयाच्या आदेशानुसार प्रॉस्फेक्त ची फीस २० रुपये निर्धारित करण्यात आली आहे परंतु अनेक महाविद्यायात २००/२००० रुपये घेतले जात आहे.. त्यांचावर तातडीने कार्यवाही करून प्रोस्फेक्त २० रुपयालाच देण्यात यावे.
आम आदमी पार्टी विद्यार्थी संघटनेच्या या महत्वपूर्ण मागण्यांवर त्वरित अंमलबजावणी करून नागपूर विद्यापीठ प्रशासनास तातडीने निर्देश देऊन सर्व मागण्या रास्त असून त्या स्वतः दखल घेऊन लवकर सोडविन्याचे आश्र्वाशन शिक्षण मंत्री महोदयांनी दिले.
यावेळी आप विद्यार्थी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष श्री. नेहाल बारेवार, ओम आरेकर, प्रतीक बावनकर, मनीष गिरडकर, गिरिश तीतरमारे, मनीष सोमकुवर, रोशन डोंगरे, पियुष आकरे सहित मोठ्या संख्येत आप विद्यार्थी संघटनेचे व युवा आघाडी चे कार्यकर्ते उपस्थित होते.