Elections

महाराष्ट्र सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ट्विटरवर ट्रेंड होतंय #ShivsenaCheatsMaharashtra; पहा नेटकऱ्यांचा संताप

Related imageMahrashtra Government Formation: महाराष्ट्र सत्ता संघर्षात आजचा दिवस अतिशय महत्वाचा ठरला, राज्यपाल कोश्यारी (BhagatSingh Koshyari) यांनी भाजपाला (BJP) सत्तास्थापनेसाठी आमंत्रण दिले असताना भाजपने आपली भूमिका मांडत शिवसेना सोबत नसल्यास आपण सत्ता स्थापन करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे, तर त्यानंतर आता शिवसेनेने (Shivsena) सुद्धा आपली सर्व शक्ती एकवटून सरकार स्थापनेसाठी प्रयत्न सुरु केले आहे. राज्यपालांच्या सूचनेनुसार येत्या दिवसात जर का शिवसेना सुद्धा सत्ता स्थापनेचा दावा करण्यास फेल झाली तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्यावाचून पर्याय उरणार नाही. राजकीय अस्थिरतेच्या या एकूणच गोंधळामुळे सामान्य जनता देखील पुरती वैतागली आहे, अशातच #ShivsenaCheatsMaharashtra हा हॅशटॅग वापरत भाजपच्या समर्थकांनी ट्विटरवरून आपला संताप मांडायला सुरुवात केली आहे. अवघ्या काहीच तासात या हॅशटॅगचा वापर करत 31 हजाराहून अधिक ट्विट करण्यात आले आहेत.

ट्विटरवर ट्रेंड होणाऱ्या या हॅशटॅगनुसार, शिवसेनेने निवडणुकीपूर्वी महायुतीतून एकत्र लढण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार जनतेने मते दिली मात्र आता शिवसेना मुख्यमंत्री पदाच्या अंतर्गत वादावर अडून राहत महायुतीला तोडू पाहत आहे. यामुळे जर का भाजपाने किंवा शिवसेनेने अन्य पक्षासोबत मिळून संयुक्तरित्या सरकार स्थापन केले तर ज्यांनी या युतीला निवडून दिले त्या जनादेशाचा अपमान होईल असे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे.

Nagpur Updates

Nagpurupdates is your local/Digital news, entertainment, Events, foodies & tech website. We provide you with the happening news, Page3 Contain and all about Nagpur Foodies & Infrastructure from the Nagpur and world.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Adblock Detected

Disable Your Add Block To View Page.