मेणबत्त्यांच्या इव्हेंटसाठी देशातली राष्ट्रीय पॉवरग्रीड बंद पाडू नका, ही नम्र विनंती- डॉ नितिन राउत
१) केवळ महाराष्ट्राचे उदाहरण घेऊ. महाराष्ट्राची विजेची कमाल मागणी २३००० मेगावॉट आहे जी लॉकडाउनमुळे आधीच १३००० मेगावॉटवर आलेली आहे. ती जर अचानक कमी केली तर विद्युत निर्मितीसंचांवर थेट परिणाम होऊन ती बंद पडतील आणि ती पुन्हा सुरू करायला १२-१६ तास लागतील.
२) हीच परिस्थिती देशभर उद्भवू शकते.
३) गेल्याकाही दशकांत हळूहळू विजेचा पुरवठा करणाऱ्या high voltage ग्रीड्स या integrate करून एक राष्ट्रीय ग्रीड तयार करण्यात आली आहे त्यामुळे आता पॉवर फेल्युअर हे राष्ट्रीय स्वरूपाचे असण्याची शक्यता निर्माण होईल.
४) याचा परिणाम इस्पितळे, पाणी पुरवठा यंत्रणा आदी २४ तास विजेची गरज असणाऱ्या अत्यावश्यक सेवांवर पडण्याची दाट शक्यता आहे.
५) वीज क्षेत्रातल्या काही जबाबदार अधिकाऱ्यांनी, तज्ज्ञांनी आजच पंतप्रधान यांना पत्र लिहून हे आवाहन मागे घेण्याची विनंती केली आहे.
६) अशीच विनंती आपण जनतेसही करूया. कृपा करून सगळे घर अंधारात ढकलून बाल्कनीत आणि खिडकीत येऊन मेणबत्त्या पेटवून उभे राहण्याचा खुळेपणा करू नका. फारफार तर खिडकी आणि बाल्कनीत अंधार करून तुमची मेणबत्ती पेटवून जी कोणती भावना व्यक्त करायची आहे ती करा.