COVID-19
वाहनधारकांना दिलासा; नितीन गडकरींनी घेतला ‘हा’ निर्णय
जगासह देशात कोरोनाने थैमान घातले आहे. देशात २१ दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. अशा परिस्थितीमध्ये आज ३१ मार्चच्या पार्श्वभूमिवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाहनधारकांच्या दृष्टीकोनातून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
ज्या गाड्यांचे रजिस्ट्रेशन, फिटनेस सर्टिफिकेट, परमीट तसेच ड्रायव्हिंग लायसेन्स यांची मुदत 31 मार्चपर्यंत वैध आहे. त्यांना 30 जून पर्यंत मुदतवाढ देण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. सगळ्या राज्य सरकारने निर्देशाचे पालन करून लोकांना कुठलाही त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी विनंती त्यांच्याकडून करण्यात आली आहे.