सध्या हा आकडा वाढत आहे, लॉकडाउनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवावा लागणार आहे, अशी शक्यता वर्तवली आहे.
गेल्या 24 तासांत 67 नवे रुग्ण सापडले. त्यातले सर्वाधिक मुंबईत सापडले. त्यानंतर पुण्यात कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील लॉकडाउनचा कालावधी वाढण्याचा इशारा दिला आहे.
राजेश टोपे म्हणाले कि, १५ एप्रिलपर्यंत राज्यातील करोनाबाधितांची संख्या कमी होण्याची आम्हाला अपेक्षा आहे. सध्या हा आकडा वाढत आहे. आपल्याला लॉकडाउनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवावा लागणार आहे, अशी शक्यता वर्तवली आहे.
तसेच, मुंबईसारख्या शहरांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव रोखणे हे कठीण काम आहे. त्यामुळे लॉकडाउन संपवण्याचा निर्णय हा पूर्ण विचार करुनच घेणे गरजेचे आहे. मुंबई आणि शहरी परिसरांमध्ये हा कालावधी वाढवावा लागणार आहे, असे माझे वैयक्तिक मत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी वेगवेगळ्या राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे चर्चा करताना लॉकडाउनचे निर्बंध टप्पाटप्प्यामध्ये काढण्यासंदर्भातील संकेत दिले.