सायबर क्राईमला रोखण्यासाठी!
नागपुर :- दिवसेंदिवस सायबर क्राईमचे प्रमाण वाढतच चालले आहे. अनेकवेळा या जाळ्यात निरपराध लोक फसतात. सायबर क्राईमचा शिकार होण्यापासून वाचण्यासाठी खालील काही गोष्टी लक्षात ठेवा. प्रत्येक अकाउंटसाठी वेगळा पासवर्ड ठेवा. तसेच असा पासवर्ड ठेवा जो माहिती करणे कठीण असेल आणि लक्षात ठेवणे सोपे असेल. सोशल किंवा सामाजिक मीडियावर सावधान रहा. गोपनीय पर्यायांमध्ये बदल करा. मोबाईल उपकरण व्हायरसच्या जाळ्यात येतात. त्यामुळे त्यांची सुरक्षितता सांभाळा. फक्त विश्वसनीय वेबसाईट मधूनच हवं ते डाउनलोड करा.
आपल्या प्रत्येक फाईलचे बॅकअप ठेवा आणि वेगवेगळ्या ठिकाणी सेव्ह करा. आपल्या वाय-फाय नेटवर्कला पासवर्डने सुरक्षित ठेवा, त्याला खुले सोडू नका. नेहमी तपासणी करत रहा. आपली ई-आयडेंटिटी जसे कि, नाव, फोन नंबर, पत्ता, आर्थिक विवरण सुरक्षित ठेवा. गोपनीय पद्धतींचा वापर करा. अशा मेल्सला उत्तर देऊ नका, जे आपला आय डी आणि पासवर्ड चेक करण्यासाठी सांगत असतील. तसेच अज्ञात लिंकवर क्लिक करण्यापासून दूर रहा. स्थानिक पोलिसांकडून नेटवरील कोणत्याही गैरकानूनी सामग्रीविषयी रिपोर्ट करा. किंवा कोणत्याही प्रकारच्या कॉम्प्युटरसंबधी मदतीसाठी टेक्नीशियनला बोलवा.