सीमेंट रोड बांधकामाकरिता वाहतूक बंद : मनपा आयुक्तांचे आदेश
नागपूर महानगरपालिकेद्वारे वर्धा रोड, हॉटेल रेडिसन ब्ल्यू ते जयताळा रस्त्यापर्यंत बांधण्यात येणा-या रस्त्यामधील आनंद पूर्ती बाजार ते भेंडे लेआउट चौक पर्यंतची वाहतूक सीमेंट रोड बांधकामाकरिता प्रतिबंधित करण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.
नागपूर महानगरपालिकेद्वारे आनंद पूर्ती बाजार ते भेंडे लेआउट चौक पर्यंत सीमेंट रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील डाव्या बाजूची वाहतूक ५ मार्च ते ५ मे २०२० या कालावधीमध्ये बंद राहिल. सदर मार्गावरील वाहतूक उजव्या बाजूने दुतर्फा व लगतच्या रस्त्यावरून वळविण्यात येईल.
विहीत कालावधीमध्ये सीमेंट रस्त्याचे बांधकाम करताना संबंधित कंत्राटदार व कार्यकारी अभियंता यांनी कामाच्या ठिकाणी सुचना फलक, काम सुरू केल्याची व पूर्ण झाल्याची दिनांक असलेले बोर्ड लावावे. पर्यायी मार्ग सुरू होत असलेल्या ठिकाणी दोन्ही टोकावर, बॅरीकेट्स जवळ, रोडवर सुरक्षा रक्षक किंवा स्वयंसेवक नेमावे. वाहतूक सुरक्षा रक्षक, वाहतूक चिन्हाचे फलक, कोन्स, बॅरिकेट्स दोरी रिफलेक्टिव्ह जॅकेट्स, एल.ई.डी. बॅटन, ब्लिकर्स आदी साहित्य उपलब्ध करून देणे.
रस्ता बांधकामादरम्यान खोदकामात काढण्यात येणारा मलबा रस्त्यावर टाकू नये. कामादरम्यान पर्यायी मार्गावर मिर्माण होणारे खड्डे तात्काळ बुजविणे. पर्यायी मार्ग सुरू होण्याच्या ठिकाणी व बांधकाम करण्यात येणा-या मार्गाच्या बाजूला वळण मार्गाचे फलक लावण्यात यावे.
रात्रीच्या वेळी एल.ई.डी. वळण फलक लावणे, बॅरिकेटींगवर एल.ई.डी. माळ लावणे आवश्यक आहे. उजव्या बाजूने दुतर्फा वाहतूक चालणार असल्याने रस्त्यावर अस्थायी दुभाजक तयार करून वाहतूक दुतर्फा वळविण्यात यावी. अनुचित प्रकारास कंत्राटदार जबाबदार राहिल.
वाहतूक नियमांचे तसेच वाहतूक पोलिसांनी दिलेल्या दिशा निर्देशाचे पालन करावे. रस्त्यावरील दुतर्फा रहिवासी किंवा कार्यालय असलेल्या नागरिकांच्या सोयीकरीता आवश्यक व्यवहार्य व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिल्या आहेत.