हिंगणा मेट्रो डेपोचे काम वेगात प्रगतीपथावर
-पूर्व – पश्चिम मेट्रो कॉरीडोर दरम्यान असलेल्या हिंगणा डेपोचे कार्य जलद गतीने सुरु आहे. नुकतेच, म्हणजे २८ जानेवारीला या एक्वा मार्गीकेवर प्रवासी वाहतूक सुरु झाली आहे. सुमारे ६५ एकर परीसरात हिंगणा मेट्रो डेपो कार्य सुरु असून यापैकी ३०.१९ एकरचा परिसर हा रोलिंग स्टॉक मेंटेनस कार्याकरीता वापरण्यात येणार आहे. या डेपोमध्ये प्रामुख्याने रोलिंग स्टॉक ( मेट्रो ट्रेन) विभागाशी संबंधित इमारती असून ज्यामध्ये टाईम आणि सिक्युरिटी कार्यालय, ऑटोमेटीक कोच वाशिंग प्लांट, ट्रॅक्शन सबस्टेशन, प्रशासकीय इमारत, ऑक्झीलरी सबस्टेशन, अंडरग्राउंड टॅक व पंप रूम, मेंटेनेंस इमारत, पीठ व्हील लेथ, इंजिनियरिंग ट्रेन युनिट (ईटीयु), आंतरिक प्लॅटफार्म क्लिनिंग तसेच अनलोडिंग प्लॅटफार्मचा समावेश आहे.