NMC
१८ फेब्रुवारीला नारा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन

नागपूर महानगरपालिका आणि आदर्श नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र प्रकल्प टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता नारा येथील हनुमान मंदिरासमोरील प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन महापौर संदीप जोशी यांच्या हस्ते होणार आहे.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समितीचे सभापती प्रदीप पोहाणे, आयुक्त तुकाराम मेंढे उपस्थित राहतील. सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, बसपा पक्षनेते वैशाली नारनवरे, राकाँ पक्षनेता दुनेश्वर पेठे, शिवसेना गटनेता किशोर कुमेरिया, वैद्यकीय व आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, कर आकारणी व कर संकलन समितीचे सभापती महेंद्र धनविजय, मंगळवारी झोनच्या सभापती गार्गी चोपरा, नगरसेविका सुषमा चौधरी, प्रमिला मंथरानी यांची उपस्थिती राहील. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा आरोग्य उपसंचालक डॉ. भावना सोनकुसळे आणि मंगळवारी झोनचे सहायक आयुक्त हरिश राऊत यांनी केले आहे.