InformativeNagpur Local

6 महिन्यांत 1074 शेतकर्‍यांची आत्महत्या: बावनकुळे यांनी केली आर्थिक पॅकेजची मागणी

नागपूर:- कोरोना साथीने राज्यातील शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहे. गेल्या 6 महिन्यांत आर्थिकदृष्ट्या सपशेल हरलेल्या 1074 गरीब आणि मध्यमवर्गीय शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. महाविकास आघाडी सरकार शेतक-यांपर्यंत पोहोचू न शकल्यामुळे आणि पॅकेज जाहीर न केल्यामुळे शेतकरी आत्महत्या करण्यास भाग पडत असल्याचा आरोप माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ज्यामुळे या शेतकरी कुटुंबांमध्ये सरकारबद्दल तीव्र नाराजी आहे.

ते म्हणाले की, जानेवारी ते जून या 6 महिन्यात जवळपास दररोज 6 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. कोरोना लॉकडाऊनचा सर्वाधिक धक्का शेतक-यांनाच बसला आहे. विशेषत: फळ आणि भाजीपाला उत्पादकांना तर सर्वाधिक फटका बसला. शेतकर्‍यांचे उत्पादन शेतातच पुर्णपणे खराब झाले.

बावनकुळे यांनी तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली, शेतक-यांना आर्थिक पेचातून मुक्त करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने तातडीने आर्थिक मदत द्यावी व नुकसान भरपाई जाहीर करावी. ते म्हणाले की, गेल्या वर्षी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झाला. संपूर्ण पश्‍चिम महाराष्ट्रात पिके नष्ट झाली.

लॉकडाऊनमुळे दुसरे संकट शेतकर्‍यांवर आले. भाजीपाल्यास भाव न मिळाल्याने, उत्पादनांची बाजारात विक्री न झाल्याने मोठे नुकसान झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीने शेतक-यांसाठी पॅकेज सादर करून मदत करावी.

Team Nagpur Updates

Nagpur Updates is your local/Digital news, entertainment, Events, foodies & tech website. We provide you with the happening news, Page3 Contain and all about Nagpur Foodies & Infrastructure from the Nagpur and world.

Related Articles

Back to top button

Adblock Detected

Disable Your Add Block To View Page.