सतरंजीपुरा व आशीनगर झोन मधील १२ जलकुंभाचा पाणी पुरवठा १८ तास राहणार बाधित
नागपूर, ८ जून २०२३ : कन्हान जलशुद्धीकरण केंद्राहून निघणाऱ्या ९०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवर (फिडर मेनवर) कन्हान -वारेगाव रोड वर (आशा हॉस्पिटल समोरील NHAI रोड) मोठी गळती उद्भवली आहे. या गळतीतून पिण्याच्या पाण्याचा फार मोठा अपव्यय होत असल्यामुळे अत्यंत तातडीने याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. या दुरुस्तीसाठी मनपा-OCW यांनी ९ जून (शुक्रवार) रोजी दुपारी ४ ते १० जून (शनिवार) दुपारी १२ वाजेपर्यंत तांत्रिक कामाकरिता १८ तासांचे शटडाऊन घेण्याचे ठरवले आहे. ह्या गळती दुरुस्ती कामादरम्यान कन्हान जलशुद्धीकरण केंद्र-९०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरून फीडर लाईनवरून पाणीपुरवठा होणारे आशीनगर झोन आणि सतरंजीपूरा झोन मधील जवळपास १२ जलकुंभाचा पाणीपुरवठा कामामुळे बाधित होणार आहे . १० जून (शनिवार) ला दुपारी २ वाजे नंतर आशीनगर झोन आणि सतरंजीपूरा झोन चा पाणीपुरवठा त्या त्या भागातल्या पाणीपुरवठा वेळेनुसार सुरळीत होईल या आकस्मिक शटडाऊनमुळे १८ तास पाणीपुरवठा बाधित राहणारे आशीनगर झोन व सतरंजीपुरा झोन मधील भाग खालील प्रमाणे : आशीनगर झोन: बिनाकी १ जलकुंभ, बिनाकी २ जलकुंभ, बिनाकी -३ जलकुंभ, इंदोरा १ जलकुंभ, इंदोरा २ जलकुंभ, गंमदूर DT आणि जसवंत DT सतरंजीपुरा झोन: बस्तरवारी जलकुंभ १, बस्तरवारी जलकुंभ २, बस्तरवारी जलकुंभ ३ आणि बेझोनबाग जलकुंभ मनपा-OCW यांनी नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे. या काळात टँकरद्वारेही पाणीपुरवठा शक्य होणार नाही. नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल मनपा-OCW दिलगीर आहेत