कोंढाळीतील 17 जण विलगीकरणात
कोंढाळी, जि. नागपूर:- येथील विकासनगरात आपल्या सासुरवाडीला नागपुर निवासी जावई आला. पश्चात तो कोरोनाबाधित असल्याची बाब पुढे आली व त्यामुळे येथील 16 जणांना नागपुरला कॉरंटाईनला पाठवण्यात आले. सध्या कोंढाळी सील करण्यात आले आहे.
नागपुरहून ऑटोचालक व्यवसायी आई व पत्नीसह 28 मे रोजी ऑटोने कोंढाळी आले. परिसरातील जागरुकांनी माहीती देताच प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायतीचे लोकांनी बाब पडताळा केली. प्राथमिक आरोग्य विभागप्रमुख चमु व ठाणेदारांनी 29 मे रोजी दुपारी ऑटो चालकासह कुटूंब, सासू सासरे अन्य दोन असे एकून सात जणांना नागपुरच्या आमदार निवास येथील कॉरंटाईन केंद्रात हलविले.
सर्वांचे अहवाल पॉझीटिव्ह आले. माहिती कळताच काटोल तालुका यंत्रणा सजग होत कारवाई सुरु झाली. विकासनगर परिसर सील करण्यात आला. काटोलचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच आरोग्य कर्मचारी व अधिकारी, पोलीस, व ग्रामपंचायतीचे पदाधिकारी होते. विकासनगरातील नागरिकांनी घाबरून न जाता संपर्कात आलेल्यांनी स्वतःहून आरोग्य तपासणी करून घेण्याचे आवाहन ध्वनीक्षेपकावरुन केले गेले. पश्चात प्रशासकीय अधिकारी कर्मचा-यांचे उपस्थितीत बाधीत क्षेत्र सील करण्यात आले.