अभ्यासक्रमात 25% कपात मग फी का पुर्ण? पालकांचा प्रश्न, राज्यमंत्र्यांच्या आदेशालाही डावलले
नागपूर:- नुकतेच शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शिक्षण विभाग आणि पालकांच्या शिष्टमंडळासमवेत झालेल्या बैठकीत शाळेने पालकांना फी भरण्यास सक्ती करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले होते. परंतु राज्यमंत्र्यांचा आदेश अद्याप शाळांपर्यंत पोहोचलेला नाही. अधिका-यांच्या मनमर्जीचा परिणाम पालकांचे त्रासात होत आहे. आता पालकांनीही असा प्रश्न विचारण्यास सुरवात केली आहे की जेव्हा कोर्स 25 टक्के कमी केला जात असेल तर मग फी का पुर्ण भरायची सक्ती केली जात आहे.
ऑरेंजसिटीत विविध पालक संघटना गेल्या 3-4 महिन्यांपासून फीविरोधात आंदोलन करीत आहेत. पालक म्हणतात की शाळा बंद आहेत आणि ऑनलाईन वर्ग चालू आहेत, मग फी देखील कपात केली गेली पाहिजे. परंतु खासगी शाळा व्यवस्थापनाकडून पालकांचे ऐकले जात नाही आणि आता तर राज्यमंत्र्यांच्या आदेशाचीही दखल घेतली जात नाही. शाळांकडे फीसंदर्भात स्वतःचे युक्तिवाद आहेत. परंतु वास्तविकता अशी आहे की आतासुद्धा बहुतेक खासगी शाळा त्यांच्या शिक्षकांकडून अर्ध्या पगारावर काम घेत आहेत. एवढेच नव्हे तर शिक्षकेतर कर्मचारीही कमी केले आहेत.
बोर्डाचे मुलांचे पालक अडकले: ऑनलाइन वर्गांमध्ये सर्वात मोठी समस्या ज्यांची मुले बोर्डाच्या वर्गात असतात अशा पालकांना भेडसावत असते. फी न भरल्याबद्दल पालकांवर खूप दबाव आहे. कधी ऑनलाईन वर्ग बंद असतो तर कधी बोर्ड परीक्षेत नोंदणीपासून रोकल्या जाते. नाईलाजाने पालकांना संपूर्ण फी जमा करणे अनिवार्य झाले आहे. बर्याच पालकांनी मुलांना ट्यूशन लावून दिली आहे. पण तिही अद्याप ऑनलाइनच चालू आहे. आता परिस्थिती अशी आहे की मुलेही ऑनलाइन वर्गांमुळे नाराज आहेत. असं सर्व असूनही शिक्षण विभाग कोणतीही कार्यवाही करीत नाही.