शिक्षणसत्र: परीक्षेसंबंधीची स्थिती स्पष्ट करा
नागपूर:- कोरोनाच्या प्रभावानंतर सरकारने महाविद्यालयांच्या परीक्षा रद्द केल्या एवढेच नाही तर, 10 वी व 12 परिक्षांचे निकाल देखील प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांना अद्याप प्रवेश परीक्षेबाबतितही संभ्रम आहे. रा.तु.म. नागपूर विद्यापीठात नागपूर आणि गोंडवाना विद्यापीठ आहे.
नागपूर विद्यापीठात नियमित विद्यार्थ्यांची संख्या 62500 पेक्षा जास्त आहे. त्याचबरोबर खासगी विद्यार्थ्यांची संख्या 8000 पेक्षा जास्त आहे. त्याचप्रमाणे गोंडवाना विद्यापीठात 17500 नियमित विद्यार्थी आणि 4750 खासगी विद्यार्थी आहेत. अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत सोशल मीडियावर विविध प्रकारच्या चर्चेमुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्येही संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑनलाईन परीक्षा पद्धत ग्रामीण भागासाठी शक्य नाही. यामुळे सोशल डिस्टंसींग चा नियम मोडेल.
कोरोनातील परिस्थिती लक्षात घेता राज्यपालांना लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी करण्यासाठी प्रभारी कुलगुरू मुरलीकर चांदेकर यांचेमार्फत राज्यपालांस हे पत्रक सोपविण्यात आले. या प्रसंगी ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे. कॉंग्रेस नेते एड अभिजित वंजारी. राजेश डांगे शुभम खुराना आदी उपस्थित होते.