कोरोना रुग्णांत वाढ, बाळगा सावधानी
नागपूर: सणासुदीच्या दिवसात कोरोनावाढीचा जाणकारांचा अंदाज पुन्हा रंग घेतोय असे दिसू लागलेय, कमी होत जाणा-या आकडेवारीने परत उभारी घेतलीय, सुरुवातीला तपासण्या कमी व रुग्णांची संख्याही कमी कमी होत असल्याने याविषयाकडे सर्वांचे दुर्लक्ष होत असल्याचेच चित्र होते. अशात आता उत्सवी खरेदीदरम्यान कोरोणा महामारीच्या प्रतिबंधक उपाययोजनांची सावधगिरी नागरिकांकडून योग्यप्रकारे न बाळगण्याचा धोकाही निर्माण झाला.
शहरात काल दिनांक 11 नोव्हेंबर रोजी 271 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले यात शहरातील 166 तर ग्रामीण भागातील 103 रुग्णांचा समावेश आहे दिवसभरात 64 कोरोना बाधित रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत तसेच सहा जणांचा मृत्यू झाला आहे चार हजार 192 रुग्णांची तपासणी करण्यात आली अशी माहिती सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्हा माहिती कार्यालयाने दिली.
कोरोना अजून पूर्णपणे गेलेला नाही त्यामुळे कोरोना विषयक दक्षता बाळगण्याचे आवाहन सर्वच यंत्रणा ठिकठिकाणी करत आहेत. बाजारपेठेतील गर्दी नियंत्रणासाठीही प्रशासन उपाय योजना राबवत आहे, अशात नागरिकांनीही आपली जबाबदारी समजून योग्य ते नियम पालन अनुसरावे.