मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पूर्व विदर्भ दौ-यावर
नागपूर:- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या शुक्रवार दि. 8 जानेवारीला पूर्व विदर्भ दौ-यावर येत असून, यात ते भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना भेटी देणार आहेत.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे हे उद्या सकाळी सव्वादहा वाजता नागपूर विमानतळावर विशेष विमानाने येणार आहेत. त्यानंतर हेलिकॉप्टरने गोसेखुर्द (जि.भंडारा) कडे प्रयाण करतील. सकाळी अकरा वाजता गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्प येथे त्यांचे आगमन होईल. त्यानंतर सकाळी पावनेबारा वाजता पवनी तालुक्यातील राजीव टेकडी येथे आगमन होईल व वेळ राखीव असेल. दुपारी 1 वाजता गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाकडे प्रयाण करतील.
दुपारी सव्वाएक वाजता ब्रह्मपुरी तालुक्यातील खेडमटकागावाकडे रवाना होतील. दुपारी दीड वाजता शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, ब्रह्मपुरी येथे आगमन होईल. त्यानंतर दुपारी 2 वाजता घोडाझरी येथे सांडकालव्याची पाहणी करण्यासाठी निघतील. त्यानंतर कालव्याची पाहणी करून अडीचच्या सुमारास शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, ब्रह्मपुरी येथे आगमन व तेथून नागपूर विमानतळाकडे हेलिकॉप्टरने प्रयाण करतील. दुपारी साधारणत: सव्वातीन वाजता नागपूर येथून मुंबईकडे रवाना होतील.