नायलॉन मांजा: एनडीएस पथकाची कारवाई , वसूल केला 1 हजारांचा दंड
नागपूर:- नायलॉन मांजावर बंदी असूनही, त्याच्या सहजपणे उपलब्धता व सहज वापराबद्दल मनपाने आता सजगता बाळगत या विरोधी कारवाया कडक केल्या आहेत. याचा अंदाज याच बाबीवरून बांधला जाऊ शकतो की या मोहीमेत अखंडीतपणे केलेल्या कारवाईत पथकाने शुक्रवारीही कारवाई केली.
मंगळवारी झोनमध्ये या पथकाने 1 हजार रुपये दंड ठोठावत 30 प्लास्टिकचे पतंग जप्त केले. उल्लेखनीय आहे की नायलॉन मांजामुळे मनपाकडून शहरात घडणा-या अपघाती घटनांचा गांभीर्याने विचार करून हि ठळक कारवाईची मोहीम सुरू केली गेली आहे. एकीकडे जनजागृती केली जात असताना दुसरीकडे अशा व्यापा-यांवरही वेसण लावली जात आहे.
आयुक्तांनी जारी केले आदेशः राज्य सरकारच्या नायलॉन मांजा आणि प्लास्टिक बंदीस न जुमानता विकल्या जाणा-या अशा साहित्यामुळे दुर्घटना आणि अपघात लक्षात घेता मनपा आयुक्त राधाकृष्णन बी, यांनी एनडीएस पथकास सशक्त मोहीम सुरू करण्याच्या सूचना दिल्या. आयुक्तांच्या आदेशावरून उपद्रव संशोधन पथक अशा प्रकारे गुपचूप मांजा आणि पतंग विक्री करणा-या दुकानदारांवर बारीक नजर ठेवून आहे. आता मकर संक्रांती जवळ आल्यामुळे कारवाई तीव्र होण्याची शक्यता आहे.