मिहानला १६०० कोटी खर्चून आपत्ती निवारण केंद्र: वडेट्टीवार
नागपूर: महाराष्ट्राचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी रविवारी सांगितले की, नागपूरच्या मिहान भागात अंदाजे १६०० कोटी रुपये खर्चून तंत्रज्ञानाने प्रगत ‘राज्य आपत्ती मदद केंद्र’ उभारले जाईल. हे केंद्र त्वरित आपत्ती आणि चक्रीवादळाविषयी सतर्कता जारी करेल आणि पाऊस व इतर आपत्तीमुळे शेतीस होणा-या नुकसानाची मॅपिंग व सर्वेक्षण करण्यास मदत करेल.
मुंबईत रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे २५ जण ठार झाल्याच्या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत हे सांगितले. ते म्हणाले, यासाठी एक सल्लागार नेमला गेला असून प्रकल्प दीड वर्षात पूर्ण होणे अपेक्षित आहे. “
मुंबई महानगरातील माहुलमध्ये १७ जणांचा भिंत कोसळल्याने मृत्यू, तर विक्रोळी येथे ७ आणि भांडुपमध्ये एकाचा मृत्यू झाला, अशी अधिका-यांनी सांगितले आहे. वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत मुंबईत मुसळधार पाऊस पडल्यानंतर टेकड्यांमध्ये राहणा-या लोकांना इशारा देण्यात आला होता असे सांगितले, परंतु बर्याचदा लोक अशा इशा-यांकडे दुर्लक्ष करतात आणि सुरक्षित ठिकाणी जाण्यास नकार देतात.