नागपूर पोलिस दलासाठी अभिमानास्पद बाब
नागपूर शहर पोलीस दलाचे प्रमुख पोलीस आयुक्त श्री अमितेशकुमार सर आणि गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्री राजमाने साहेब यांच्या पाठिंब्याने व सहकार्याने सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, येथे कार्यरत महिला पोलीस उप निरीक्षक मंगला हरडे (नांदगाये) या स्वतः च्या जिद्द आणि मेहनती च्या बळावर कोण होणार करोडपती या कार्यक्रमाच्या हॉट सीट वर पोहोचल्या असून एक उत्तम उदाहरण निर्माण केला आहे, ही संपूर्ण नागपूर पोलीस दलासाठी आणि संपूर्ण नागपूर करांसाठी अतिशय आनंदाची व अभिमानाची बाब आहे..
कोण होणार करोडपती’च्या मंचावर नागपूरच्या महिला पी.एस.आय.! – पाह, ‘कोण होणार करोडपती’,१३ ऑगस्ट, शुक्रवार रात्री ९ वाजता आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.
सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर अगदी गावखेड्यांतल्या शेतकऱ्यांपासून ते शहरातल्या अधिकाऱ्यांपर्यंत सगळेच आपलं स्वप्न साकार करण्यासाठी आले आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रांतली कर्तबगार मंडळी या मंचावर येऊन गेली आहेत. असेच एक कर्तबगार व्यक्तिमतत्त्व म्हणजे नागपूरच्या महिला पी.एस.आय. मंगला हरडे. ‘कोण होणार करोडपती’च्या मंचावर येण्यासाठी अगदी प्राथमिक फेरीपासून त्या आपल्या ज्ञानाची उजळणी देत करत आल्या आहेत. त्यांच्या ज्ञानाने त्या आज एका मोठ्या हुद्द्यावर असून शासकीय सेवेतून जनसेवा करत आहेत. आयुष्यात एकदातरी ‘कोण होणार करोडपती’च्या हॉटसीटवर बसावं असं त्यांचं स्वप्न होतं. सचिन खेडेकरांसारख्या उत्तम सूत्रसंचालकासमोर बसून मंगला हरडे आपल्या ज्ञानाची एक वेगळी कसोटी देणार आहेत.
पी.एस.आय. मंगला हरडे या आपल्या ज्ञानाच्या साथीनी नेमका कुठला पल्ला गाठणार आहेत, हे जाणून घेण्यासाठी नक्की बघा ‘कोण होणार करोडपती’, १३ ऑगस्ट, शुक्रवार, रात्री ९ वाजता, आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.