भारत मुक्ती मोर्चाच्या कार्यकर्त्यांचे RSS कार्यालयाबाहेर आंदोलन, धारा-144 लागू, अनेक नेत्यांना ताब्यात
नागपूर, 06 ऑक्टोबर: भारत मुक्ती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RRSS) कार्यालयाबाहेर आंदोलन केले. नागपूर पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. नागपूर पोलीस आयुक्तांनी सांगितले की, भारत मुक्ती मोर्चाने ६ ऑक्टोबरला रॅली आणि मोर्चासाठी परवानगी मागितली होती. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने आम्ही त्यांना परवानगी दिली नाही. त्यांच्या लोकांनी सहकार्य न केल्यामुळे आम्ही जरीपटका आणि पाचपोली भागात CrPC चे कलम-144 लागू केले आहे. काही नेत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
वामन मेश्राम यांच्या नेतृत्वाखालील भारत मुक्ती मोर्चाने गुरुवारी नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुख्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न केला,दरम्यान, पोलिसांनी वामन मेश्राम याला ताब्यात घेतले आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी भारत मुक्ती मोर्चाचे शेकडो कार्यकर्ते नागपुरात पोहोचले होते. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली.