नागपुरचे युवक करताहेत कुतुहास्पद कार्य
“कोरोना ” या तीन शब्दांनी संपूर्ण जग सध्या हादरल आहे त्यात अनेक प्रकारचा सामना आपल्याला करावा लागत आहे, यात अनेक देश सध्या या रोगाचा सामना करत आहे , यात संपूर्ण देशवासियांची एकच हाक ऐकायला मिळत आहे ती म्हणजे (#भारतको #जिताना हैं #कोरोनाको #हरानाहैं*) आज सकाळी ७ते रात्री९ पर्यंत जनता कर्फ़्यू निमित्त घरी होतो. आपण दिवसभर चहा,पाणी,जेवण,सगळ काही केल. पण राहून राहून एक विचार सतावत होता कि रस्त्यावर, आहेत त्यांच् कस? आपल्या सुरक्षित ते करता जे दिवसभर तैनात होते.
अश्या आमच्या पोलीस बांधवाना,आणि गरीब,तसेच बाहेरील राज्यातील अडकलेल्या आमच्या काही बंधु बांधवांना मोहित हिरडे नचिकेत काळे ,केतकी काळे, यांनी मिळून मसाले भाताचे व पोळी भाजी याचे वाटप केले.पोलीसांची परवानगी घेऊन एक छोटीशी मदत करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे मोहीत हिरडे यांनी 21ला रात्री सुद्धा अश्या प्रकारच्या खाद्य वाटप केले.पर्वा २२तारखेला मोहित हिरडे,नचिकेत काळे ,केतकी काळे आम्ही तिघांनी मिळून रात्री ९,३०ला अन्न वाटप करण्याचे ठरवले, त्यात आम्ही पोलीस स्टेशन रेल्वे स्टेशन,वरील अडकलेल्या बांधवांना अन्न वाटप केले,आणि काल सकाळी आम्हाला आमचा अजून एक मित्र जॉईन झाला मंगेश कुर्हेकर,प्रशांत कारळकर,स्मिता महाजन,उषा राखडे, तसेच आता आम्ही जे ३होतो ते आता सावित्री विहार येथील सगळे परिवार या कार्यासाठी एकत्र आले आहेत.
जेथे आम्ही राहतो तेथील प्रत्येक घरात आम्ही आव्हान केले की ३पोळी प्रत्येक व्यक्तीने आणून द्या याला छान प्रतिसाद देत.आमच्या येथील महिलांनी आम्हाला मदत केली. काल सकाळी आणि रात्री ही आम्ही,सोनेगव, बजाज नगर,सीताबर्डी, पोलीस स्टेशन मध्ये आणि रेलवे स्टेशन वर अन्न वाटप केले,सैनीटाइजर, मास्क् पण, काल रात्री पोलसांचा फोन आला आणि आम्ही त्यांनी सांगितल म्हणून थाबलो.त्यानी म्हंटल आम्ही फोन करु तुम्हाला तेव्हा परत सुरु करा.आम्ही पोलीस बांधवां सोबत आपण सर्व सुरक्षित राहावे. आणि आपल्या पोलीस बांधव तसेच बाहेरील राज्यातील अडकलेल्या लोकांना मदत व्हावी या शुद्ध उद्देश्याने हे काम करतोय.तेव्हा आपणा सर्वांना विनंती माननीय पंतप्रधान,आणि मुख्यमंत्री यांनी आवाहन केलेल्या प्रत्येक गोष्टी सहाय्य करा. कृपया घरी बसून देवाला प्रार्थना करा. की या जगाला संकटातुन मुक्ती दे. या साठी चैत्र नवरात्रि सुरु आहे. तेव्हा श्रीराम जयराम जय जयराम हा जप करा.हे सर्व काम आम्ही रीतसर पोलीस प्रशासनाच्या परवांगीने करतोय.