नागपूर डिस्टिलरीची रुग्णालये आणि पोलिस प्रशासनाला ,3000 लिटर विनामूल्य देण्याची योजना आहे.
नागपूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने अन्न धान्य पुरवठा विभागा मार्फत असलेल्या रेशन दुकानात व मदर डेअरीच्या शाखेत सुद्धा जादा नागरिकांची वर्दळ राहत असल्याने जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे सरांचे निर्देशानुसार 900 लिटर हँड सॅनिटायझर नागपूर डिस्ट्रीलरीच्या माध्यमा तून निःशुल्क उपलब्ध करुन दिल्या.
आयुक्त राज्य उत्पादन शुल्क मुंबई कांतीलाल उमाप सर यांनी मद्य व्यवसायीकाना हँड सॅनिटायझर निर्मिती बाबत आवाहन केल्या वरुन नागपूर मधील नागपूर डिस्ट्रीलरी, मानस ऍग्रो व रॉयल ड्रिंक्स यांनी हँड सॅनिटायझर उत्पादन सुरु केले आहे. यामध्ये नागपूर डिस्ट्रीलरी यांनी हॉस्पिटलस व पोलीस प्रशासन यांना २० हजार लिटर निःशुल्क देण्याचे नियोजन केले आहे. याबाबत पोलीस आयुक्त डॉक्टर भूषणकुमार उपाध्याय सर, पोलीस अधीक्षक ग्रामीण ओला सर तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त मोहन वर्दे सर यांचेशी चर्चा करुन अधीक्षक प्रमोद सोनोने यांनी अन्न धान्य पुरवठा विभागास 700 लिटर व मदर डेअरी साठी 200 लिटर हँड सॅनिटायझर रोहिणी पाटराबे सहाय्यक अन्न धान्य वितरण अधिकारी, रागिणी फुलझडे झोनल अधिकारी टेका नाका तसेच डॉ. सलीम राजू यांच्या उपस्थितीत सुपूर्त केल्या.