मी एकदम फिट, चाहत्यांना केले लॉकडाऊन पाळण्याचे आवाहन:नितीन गडकरी म्हणाले
नागपूर:- लॉकडाऊन असल्याने गडकरी नागपूरमध्येच आहेत. त्यांच्या कार्यालयातही विचारणा केली असता कोणालाच याविषयी फारशी माहिती नव्हती. आज गडकरी यांनीच स्वतःच तब्येतीविषयी खुलासा केला. आपण एकच दिवस इस्पितळात होतो. काळजी करण्याचे कारण नाही. आपण एकमद फिट असून कामाला लागलो असल्याचे त्यांनी जाहीर करून चाहत्यांना दिलासा दिला.
आज अनेक वृत्त वाहिन्यांवरसुद्धा गडकरी झळकले. करोना या विषयावरील चर्चेतही सहभागी झाले होते. या दरम्यान विचारण्यात आलेल्या तब्येतीविषयी प्रश्नाला उत्तर देताना कळजी करण्याचे कारण नसून आपण फिट आणि फाईन असल्याचे गडकरी यांनी सांगितले.
अँजिओप्लास्टी झाल्याच्या वार्तेन चिंतेत आपल्या चाहत्यांना केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी आपण एकदम फिट असल्याचे सांगून दिलासा दिला. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये गुठळ्या आढळल्याने चार दिवसांपूर्वी त्यांच्या शरिरात चार दिवसांपूर्वी एक स्टेंट टाकण्यात आली.
प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. हर्षवर्धन मार्डीकर यांच्या इस्पितळात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. खाजगी बाब असल्याने तसेच भेटणाऱ्यांचा त्रास होऊ नये याकरिता त्यांच्या कुटुंबीयांनी याची माहिती कोणाला दिली नाही. फक्त एकच दिवस ते इस्पितळात होते. मात्र अँजिओप्लास्टीचे वृत्त फुटले. त्यामुळे अनेकजण चिंतेत पडले होते. नेमके काय झाले आणि केव्हा झाल विचारपूस केली जात होती.