नवतपा च्या पहिल्याच दिवशी नागपूर शहरात उन्हानें कहर गाठला
नागपूर:- नवतपा च्या पहिल्याच दिवशी शहरात उन्हानें कहर गाठला. सूर्याच्या रौद्र रूपामुळे माणसेच नाहीत पशु -पक्षीही सावलीत दडून आहेत. सकाळी 9-10 वाजताच पाखरांचा कलकलाट बंद होतो. लोक घरात दडून आहेत. बाहेर जाणारे सर्व चेहरा-डोक्यावर कापड गुंडाळूनच घराबाहेर निघताहेत.
आकाशातून तब्बल सायंकाळचे 6 वाजेपर्यंत जणू अग्निवर्षाव होतो आहे ज्यामुळे शहराचे कमाल तापमान 47⁰ सेंल्सियस वर पोचले जे सरासरीपेक्षा 3.8⁰ सेल्सियस जास्त होते. रात्रवेळी तरी जरा दिलासादायी तापमान आहे. किमान तापमान 26.7⁰ नोंदले गेलेय जे सरासरीपेक्षा 2.1⁰ कमी आहे. दिवसा ताप आणि रात्रवेळी हलका दिलासादायक हंगाम चालू आहे. नवतप्याचे पहिलाच दिवशी पारा 47⁰ वर पोचला आहे. तो वाढण्याचाच अंदाज आहे.
3 दिवसांचा रेड अलर्ट: हवामान विभागाने नागपूर सह विदर्भातील ईतर जिल्हांस पुढिल 3 दिवसांचा रेड अलर्ट घोषित केलाय. लोकांस सतर्कतेची सुचना दिली आहे. दिवसभर उष्ण वारे चालू आहेत जे सायंकाळी उशीरापर्यंत असतात यांपासून बचावाची सुचना जिल्हा प्रशासनाने केली. हवामान विभागाने 25 ते 27 पर्यंत रेड अलर्ट घोषित केलाय. यासह नागपूर, अकोला, चंद्रपूर, गोंदिया, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांत ब-याच जागी 28 में रोजी तिव्र उष्णतेच्या लाटांची शक्यता आहे. म्हणजेच पुढील काही दिवस तिव्र गर्मी व पोळणारे उष्ण वा-यांच्या लहरी झेलाव्या लागतील.
तापमानात सलग वाढ: मागील 4-5 दिवसांपासून शहराचे तापमान सतत वेगाने वाढत आहे. 22 मे रोजी कमाल तापमान 45.6⁰ होते जे 23 रोजी 46.5⁰ वर गेले. त्यानंतर 24 मे रोजी 46.7⁰ नोंदले गेले. दुसर्याच दिवशी वाढत 47⁰ वर पोचले, ह्याच गतीने प्रवास राहिल्यास 2013 मधील 47.9⁰ सेल्सियसचा रेकॉर्ड लवकरच मागे पडेल.
लोक दुपारी 12 ते सायं. 6 वा. कालावधीत बाहेर पडायचे टाळत आहेत. दुपारी शहरांतील रोड रिकामे असल्याचे चित्र दिसते. अगदी पाखरांचा कलकलाटही बंद दिसतोय.
अकोला सर्वाधिक: विदर्भात सोमवारी अकोल्याचे तापमान सर्वाधिक होते. तेथे कमाल तापमान 47.4⁰ नोंद केले गेले. तर अमरावती 46⁰, चंद्रपूर 46.8⁰, वर्धा 46⁰ आणि यवतमाळ 45.4⁰ नोंदले गेले. गडचिरोली 43.2⁰, बुलढाणा 42.6⁰ आणि ब्रम्हपुरी 45.2⁰ से. होते याचाच अर्थ संपूर्ण विदर्भ भयानक उष्णतेच्या गर्तेत आहे.
विदर्भातील स्थिती
- अकोला 47.4
- अमरावती 46.0
- चंद्रपूर 46.8
- गोंदिया 45.8
- वर्धा 46.0
- यवतमाळ 45.4
- गडचिरोली 43.2
- ब्रम्हपुरी 45.2